Solapur Co-Operative Bank
Solapur DCC BankAgrowon

Solapur DCC Bank : संचालकांच्या अपिलावर चार आठवड्यात निर्णय घ्या

Cooperative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढलेल्या वसुली नोटीसीविरोधात बँकेचे माजी संचालक, माजी अधिकारी आणि माजी कर्मचारी यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले आहे.
Published on

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढलेल्या वसुली नोटीसीविरोधात बँकेचे माजी संचालक, माजी अधिकारी आणि माजी कर्मचारी यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले आहे.

पण या अपिलावर त्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही, या अपिलावर चार आठवड्यांच्या आत निर्णय घ्या, असे आदेश आता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिले आहेत.

Solapur Co-Operative Bank
Solapur DCC Bank : तत्कालीन संचालकांकडून २३८ कोटींची वसुली

नियम डावलून झालेले कर्ज वाटप, कर्ज वसुलीसाठी संचालक, अधिकारी व कर्मचारी म्हणून कर्तव्यात केलेली कसूर यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २३८ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने ३५ जणांना जबाबदार धरण्यात आले आहे. तसेच या नुकसानीची रक्कम व्याजासह वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेने संबंधितांना वसुली नोटीस बजावली आहे.

Solapur Co-Operative Bank
Solapur DCC Bank : मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा पैसा येईपर्यंत लढणार

या नोटीसीच्या विरोधात १५ हून अधिक माजी संचालक आणि अधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्याकडे अपील केले आहे. पण या अपिलावर सहकार मंत्र्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

जबाबदारी निश्चितीमध्ये बँकेचे खासगी लेखा परीक्षक संजय कोठडिया यांनाही जबाबदार धरत वसुलीची नोटीस बजावली आहे. पण निर्णय न दिल्याने या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती बोरकर यांनी हे आदेश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com