Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health: मातीचे आरोग्य सांभाळल्यास समस्या सुटतील

Silk Farmers: रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी मातीच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात मांडले. मराठवाडा, विशेषतः बीड जिल्हा, रेशीम उत्पादनाच्या आघाडीवर असून, शेतकऱ्यांना यातून मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar: रेशीम उद्योगासाठीच्या तुती शेतीत मातीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या मातीचे आरोग्य जपल्यास रेशीम उद्योगातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे सहज सोडविता येतील, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मृदाशास्त्र विभाग प्रमुख तथा उपसंचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिला.

‘सकाळ-ॲग्रोवन’, एमजीएम हिल्स गांधेली, आत्मा, रेशीम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमांतर्गत एमजीएम कृषी विज्ञान केंद्र परिसरातील सभागृहात गुरुवारी (ता. ७) रेशीम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएम हिल्सचे संचालक डॉ. कामेश धापके, तर प्रमुख पाहुणे म्हणून रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, वनामकृवी परभणीचे कीटक शास्त्रज्ञ तथा रेशीम संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक डॉ. अभय पडीले, रेशीमचे माजी उपसंचालक दिलीप हाके, जालन्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती  होती. 

डॉ. कौसडीकर म्हणाले, की सर्व उत्पादन दर्जाचे व्हावे आपली उत्पादकता वाढावी यासाठी जमिनीचे आरोग्य व संतुलित पीक पोषण महत्त्वाचे आहे. मातीच्या रक्षणासाठी जैविक अच्छादन तंत्र स्वीकारा, वेस्ट पासून बेस्ट होण्यासाठी प्रयत्न करा, मातीची रेती होण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल थांबविण्यासाठी हे आवश्यक आहे. निमवृक्ष जमिनीसाठी कल्पवृक्षाप्रमाणे आहे, असे डॉ. कौसडीकर म्हणाले. 

डॉ. लटपटे यांनी रेशीम उद्योगातील अग्रणी देश चीनचे उत्पादन घटल्याचा उल्लेख करत ही भारतासाठी संधी आहे. रेशीम मध्ये अग्रेसर महाराष्ट्राने त्यातही मराठवाड्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. श्री. हाके म्हणाले, की रेशीम उद्योगातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करण्याची गरज आहे.

अंडीपुंज निर्मितीमुळे आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगून त्यांनी शासनाची धोरण, योजना यावर प्रकाश टाकला. श्री. मोहिते यांनी रोपाद्वारे तुती लागवड व जोपासना, श्री. डेंगळे यांनी उंझी माशी नियंत्रण तर सूरज टोपे यांनी उत्तम रेशीम धागा निर्मिती, कोष पश्चात तंत्रज्ञान व संधी यावर प्रकाश टाकला.

विस्तार आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

रेशीम संचालनालयाचे उपसंचालक श्री. ढवळे म्हणाले, की रेशीम उद्योगाच्या विस्तार आणि सक्षमीकरणासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. संशोधनाचा अभाव दूर करण्यासाठी ही काम सुरू आहे. उद्योग म्हणून रेशीम कडे बघण्याची गरज आहे. एका रेशीम वस्त्रातील विक्रीतून ५२ टक्के वाटा रेशीम कोष उत्पादकाला मिळतो. भारतामध्ये रेशीम वाढीचा सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहे. त्यातही बीड जिल्ह्या अग्रेसर आहे. २५ पैकी १९ ऑटोमॅटिक रेलिंग युनिट उभे राहिले. बीडची रेशीम बाजारपेठ झपाट्याने विस्तारते आहे. जालनाही लवकरच सुरू होईल, असे श्री ढवळे म्हणाले. 

तुती, कोष ते कापड निर्मिती असा संकल्प करून एमजीएमचे काम सुरू आहे. त्यासाठी एमजीएमचे प्रक्षेत्रावर तुती लागवडीचे प्रात्यक्षिक, कोष उत्पादन, रीलिंग युनिट त्यामाध्यमातून धागानिर्मिती सुरू आहे. शेतकरी हित आणि प्रबोधनासाठी आम्ही कायम आग्रही असतो.
डॉ. कामेश धापके, संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT