Tax Refund Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Tax Refund : ...तर शेतकऱ्यांनाही कर परतावा मिळावा

Agriculture Update : शेतकरी कृषी निविष्ठा, यांत्रिकीकरण खरेदी करताना जीएसटी भरत असतो. मात्र कुठलाही कर परतावा दिला जात नाही.

Team Agrowon

Nashik News : कृषी क्षेत्रातील उद्योग व्यवसाय जीएसटी देतात.मात्र संबंधित कार्यालयाकडे पूर्तता केल्यानंतर त्यांना जीएसटी परतावा मिळतो. मात्र शेतकरी कृषी निविष्ठा, यांत्रिकीकरण खरेदी करताना जीएसटी भरत असतो. मात्र कुठलाही कर परतावा दिला जात नाही. एकीकडे शहरातील मंडळी शेतकरी कर भरत नसल्याचे सांगतात. त्यामुळे कर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही परतावा मिळाला पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केले.

पिंपळगाव बसवंत येथे प्रयोगशील संशोधक शेतकरी प्रवीण मोगल यांनी विकसित केलेल्या ‘लो-व्हॉल्यूम स्प्रेयर’ यंत्रांच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे संचालक माणिकराव पाटील, नाशिक विभागीय मानद सचिव बबनराव घोलप, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, देवराम मोगल, माजी मानद सचिव अरुण मोरे, दाभोळकर प्रयोग परिवाराचे मुख्य समन्वयक वासुदेव काठे, अनंत मोरे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट सचिन वाळुंज, रामराव मोगल, प्रवीण मोगल, सचिन मोगल उपस्थित होते.

भोसले म्हणाले, की कृषी उपज योजनाअंतर्गत एकूण द्राक्ष निर्यातीच्या ७ टक्के निर्यात परतावा मिळत होता. मात्र पुढे ‘रोडटेप योजनेअंतर्गत बदल झाले. पूर्वी ९ ते १२ रुपये मिळत असताना आता अवघे किलोमागे ३ रुपये मिळत आहेत त्यात अवघी ३० पैसे वाढ झाली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच परतावा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यातून निर्यातदार व शेतकऱ्यांना लाभ होईल असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी द्राक्ष शेतीत प्रयोगशीलतेने काम करणाऱ्या महिला द्राक्ष उत्पादकांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श कामकाज करून दाखवावे, अशी अपेक्षा भोसले यांनी बोलताना व्यक्त केली. या वेळी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, वासुदेव काठे, अनंत मोरे आदींची मनोगत झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT