Forest Department Agrowon
ॲग्रो विशेष

Snake Bite Awareness : वन्यजीव सप्ताहानिमित्त जुन्नरला सर्पदंश प्रबोधन कार्यक्रम

Latest Marathi News : ग्रामीण भागात वाढत्या सर्पदंशामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. साप हे शेतकऱ्यांचे मित्र असले, तरी सर्पदंश टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

Team Agrowon

Pune News : ग्रामीण भागात वाढत्या सर्पदंशामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. साप हे शेतकऱ्यांचे मित्र असले, तरी सर्पदंश टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी घरात आणि घराच्या परिसरात, गोठ्यात अडगळीचे सामान ठेवू नये.

साप घरात येऊ नयेत यासाठी घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. सर्पदंश झाल्यानंतरचे प्रथमोपचार शिकून घ्यावेत, असे आवाहन शून्य सर्पदंश मोहिमेचे प्रवर्तक आणि सर्पदंशावर उपचार पद्धती विकसित केलेले विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी केले.

वन्यजीव सप्ताहानिमित्त जुन्नर वनविभागाच्या वतीने सर्पदंश जनजागृती कार्यशाळा वन विभागाच्या शिवराई संकुलात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सहायक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी शून्य सर्पदंश मोहिमेअंतर्गत माहितीपट दाखविण्यात आला. विषारी व बिनविषारी सर्प ओळखणे, सर्पदंश झाल्यास दिसणारी लक्षणे, प्रथोमोपचार, उपचार, सर्पदंशाने होणारे दुष्परिणाम, प्रतिबंध, सर्पदंश झाल्यास काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी सर्पदंशापासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देत डॉ. राऊत यांनी रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्याचे आवाहन केले. डॉ. पल्लवी राऊत यांनी या वेळी सर्पदंश झाल्यास बॅंडेजचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले, तर आभार महेंद्र ढोरे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT