Snake Bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या ४३० रुग्णांची नोंद

Snake Bike Treatment : गेल्या वर्षी सर्पदंशाची ६१७ प्रकरणे नोंदविली गेली होती, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
snake bite
snake bite Agrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा पुणे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्पदंशाच्या घटना कमी झाल्या आहेत. जिल्ह्यात १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ४३० रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या वर्षी ६१७ प्रकरणे नोंदविली गेली होती, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

दर वर्षी पावसाळ्यात सर्पदंशांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. प्रामुख्याने पुणे ग्रामीण भागात जेथे सामान्यतः सर्पदंशाच्या घटनेचे प्रमाण अधिक असते. गेल्या वर्षीच्या ५३४ प्रकरणांच्या तुलनेत या वर्षी केवळ २४० प्रकरणे नोंदली गेली आहेत. एकूणच प्रकरणे कमी होत असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या वर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अनुक्रमे ६६ आणि २२४ प्रकरणे नोंदविली गेली आहेत.

snake bite
Snake Bite : पावसाळ्यातील सर्पदंश सर्पदंश कसा टाळावा

ग्रामीण भागात १३ तालुक्यांपैकी तीन तालुक्यांमध्ये जास्त संख्या नोंदवली गेली. यामध्ये जुन्नरमध्ये ५४, शिरूर ३५ आणि हवेली १८ प्रकरणांचा समावेश आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये जुन्नरमध्ये ११५, तर शिरूर आणि हवेली तालुक्यांत अनुक्रमे ४८ आणि २९ प्रकरणे नोंदली गेली होती. पुणे जिल्ह्यात विविध प्रकारचे साप आढळतात. कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि इचिस कॅरिनेट्‍स असे चार प्रकारचे विषारी साप पुण्यात आढळतात.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. सर्पदंशाच्या घटना घडल्या असूनही गेल्या दोन वर्षांत एकही जीवितहानी झालेली नाही, असे पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकरणे जुन्नर, बारामती, हवेली यांसारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागांत आढळून येत आहेत. सध्या सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशासाठी लशींचा अतिरिक्त संग्रह आहे. सर्पदंशाच्या केसेस हाताळण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
आमच्या निरीक्षणानुसार, महापालिकेच्या हद्दीत बहुतेक साप चावण्याच्या घटना बांधकामाधीन जागेवरून येतात आणि बांधकाम कामगारांना याचा फटका अनेकदा बसतो. पर्यावरणावरील अतिक्रमणाचे हे स्पष्ट संकेत आहे. अनेक वेळा बांधकाम कामगार दाट झाडीजवळ झोपड्या उभारतात.
- आदित्य परांजपे, वन्यजीव वॉर्डन, वन्यविभाग, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com