Objection to underpayment Agrowon
ॲग्रो विशेष

Land Compensation : सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीला अल्पमोबदला

Objection to Underpayment : सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी दिलेल्या मोबदल्याच्या घोषित निवाड्यामध्ये अल्पमोबदला दिल्याचा आक्षेप घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी दिलेल्या मोबदल्याच्या घोषित निवाड्यामध्ये अल्पमोबदला दिल्याचा आक्षेप घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले आहे. अॅड. इंद्रजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

राजेंद्र इनामदार, रणजित काटे, सुनील खर्डे, राम खर्डे, मुकुंद पाटील, गजेंद्र इनामदार, नारायण माळी, भगवंत देशमुख, गणेश पाटील, राहूल राठोड आदींसह अनेक शेतकरी या वेळी उपस्थित होते.

या बाबत माहिती अशी, की मार्डी येथील एकूण ६२ गटातील ३८.९३ हेक्टर आर इतके क्षेत्र या महामार्गासाठी संपादित करण्याबाबत या आधीच निवाडा घोषित केला आहे. सदरचा निवाडा घोषित करत असताना २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीतील खरेदी-विक्रीचा तक्ता विचारात घेतला गेला आहे.

असे असताना जिरायत, बागायत आणि बिगरशेती प्रतवारीनुसार या तक्त्याचा विचार करता २०१९ मध्ये जादा रक्कम खरेदी-विक्रीमध्ये दिसून येते, ही वस्तुस्थिती आहे. पण २०२१ आणि २०२२ मध्ये मात्र कमी रकमेचे व्यवहार झाल्याचे दर्शविण्यात आले आहे आणि त्याआधारे जमिनीला सरासरी किंमत कमी दर्शविण्यात आली आहे.

मोबदल्यासाठी गुणांकपद्धती चुकीची

या मार्गाच्या संपादन अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचेही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. वास्तविक, या मोबदला देताना ग्रामीण भागासाठी गुणांकपद्धतीचा विचार केला जातो, त्यात ग्रामीण भागासाठी ४ गुणांक आणि शहरी भागासाठी २ गुणांक असताना, प्रत्यक्षात गुणांक १ नुसार आम्हाला ग्रामीण भागासाठी मोबदला नमूद केला आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT