Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation : कळंबी कालव्यात म्हैसाळच्या पाण्याची गती मंद

Agriculture Irrigation : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कळंबी कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीला पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर अखेर पाणी सुरू करण्यात आले, मात्र ते मंदगतीने पुढे सरकत आहे.

Team Agrowon

Sangli News : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कळंबी कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीला पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर अखेर पाणी सुरू करण्यात आले, मात्र ते मंदगतीने पुढे सरकत आहे. पाण्याची टंचाई तीव्र आहे. त्यातच पाणीपट्टी वसुलीचा मुद्दा वादाचा ठरत असल्याचे चित्र आहे. परिणामी मल्लेवाडी, एरंडोलीसह मालगाव परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

‘टेल टू एंड’ पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जत तालुक्यासाठी आधी पाणी सुरू झाले. मिरज तालुक्यातील शेवटचा भाग पाण्याची वाट पाहतोय. ते पाणी सुरू होण्यात अनेक गोंधळ यावर्षी झाल्याचे समोर येत आहे. पाणीपट्टी वसुली, पाण्याची मागणी हा दरवर्षी ठरलेला गोंधळाचा कार्यक्रम याही वर्षी झाला.

पाणी वापर सोसायट्या नसल्याने कुणीतरी एखाद्याने, काहीतरी सांगितले म्हणून पाणी सोडायला वेळ लागला, असेही युक्तिवाद केले जात आहेत. त्याचा मोठा फटका यावर्षी कळंबी कालव्याला बसताना दिसतो आहे. या कालव्यातून पाणी उशिरा सुरू झाले आहे.

जानेवारी निम्मा संपला. आता कालव्यात पाणी सोडले आहे. तेही पुढे सरकायला तयार नाही. पाणी पुढे जाण्याचा वेग अत्यंत कमी आहे. ते एरंडोली, तेथून पुढे मालगावला कधी जाणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

या टप्प्यावर आता मल्लेवाडी, टाकळी, बोलवाड या गावांना ओढ्यावाटे पाणी सोडण्याचा प्रश्‍न पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. कारण या गावांना पाणी सोडणारा पोटकालवा एरंडोली येथे आहे. तो सतत फोडला जातो. आधी मालगावला पाणी पोहोचले पाहिजे, त्यानंतर पोटकालवा सुरू केला पाहिजे, असे धोरण आहे.

परंतु, पाणीच उशिरा आल्याने यावर्षी पुन्हा वाद होऊ शकतो, अशी चिन्हे आहेत. तो टाळण्यासाठी कालव्यातून गतीने पाणी पुढे सरकेल, अशी व्यवस्था पाटबंधारे विभागाने करावी, अशी मागणी होत आहे. या कालव्यातील पाणी सोडण्याचा वेग वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

APMC Cess Cancellation: बाजार समित्यांच्या सेस रद्दबाबत तोडगा काढू; पणनमंत्री रावल

Sugar Stock Controversy: साखरेच्या ४८ लाख टनांचा हिशेब द्या; राजू शेट्टींचा केंद्र सरकारला सवाल

Pune Monsoon Situation: पश्चिम पुण्यात पावसाची उघडीप; पूर्व भागात प्रतीक्षा

MPSC Agriculture Service Issue: कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी करणार आंदोलन

SCROLL FOR NEXT