Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : खान्देशात पीक कर्जवाटप संथ गतीनेच सुरू

Crop Loan : खानदेशात पीक कर्जवाटप संथ गतीनेच सुरू आहे. सुमारे तीन हजार नवे कर्जप्रस्ताव बँकांमध्ये पडून आहेत.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात पीक कर्जवाटप संथ गतीनेच सुरू आहे. सुमारे तीन हजार नवे कर्जप्रस्ताव बँकांमध्ये पडून आहेत.

राष्ट्रीय बँका वर्षभर पीककर्ज वितरित करतात. रब्बी हंगामातही या बँकांकडून अधिकचे पीककर्ज वितरण अपेक्षित असते. यंदा रब्बी हंगामात खानदेशात सुमारे ६०० कोटी रुपये पीककर्ज वितरण होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु रब्बी हंगामाचे अडीच महिने पूर्ण झालेले असतानादेखील निम्मेही पीककर्ज वितरण झालेले नाही.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५० कोटी रुपये पीककर्ज वितरण रब्बी हंगामात अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यात बँकांकडून पीककर्ज वितरणाबाबत समाधानकारक कार्यवाही सुरू नाही.

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्र गोळा केली आहेत. त्यात फेरफार नोंदी, शेतजमिनीचे मूल्यांकन मिळविताना अधिकचा त्रास झाला. यात अनेक दिवस गेले. यानंतर पीक कर्जासाठी बँकेत नव्याने प्रस्ताव सादर केले. पण बँक त्यावर निर्णय घेत नाही.

अनेक बँकांमध्ये व्यवस्थापक प्रभारी आहेत. काही शाखांमधील अधिकारी प्रशिक्षणार्थ बाहेर आहेत. यामुळेदेखील पीक कर्जाबाबत निर्णय होत नसल्याची माहिती आहे. रब्बी हंगामात पपई, केळी, भाजीपाला पिके लागवडीसाठी पीक कर्जाची गरज आहे.

राष्ट्रीय बँकांना खानदेशात पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक अधिक आहे. त्यापाठोपाठ जिल्हा बँकांना लक्ष्यांक आहे. धुळे व नंदुरबारमध्ये जिल्हा बँकेला रब्बीमध्ये पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांकच नाही. या भागात अग्रणी बँकांच्या पुढाकाराने राष्ट्रीय बँकांना पीककर्ज वितरित करायचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT