Safflower Sowing : रब्बी हंगामात करडईची पेरणी वाढली

Oilseed Cultivation : मागील काही वर्षात बाजारपेठ व बाजारमुल्यामुळे करडई ही नामशेष होते की काय अशी शंका येऊ लागली होती. परंतु सन २०२० पासून कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन केंद्राच्या सहकार्याने करडईचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिके दिल्याने पिकाचा पेरा वाढला आहे.
Kardai Cultivation
Karadai Cultivation Agrowon
Published on
Updated on

Washim News : तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. तालुक्यात गोभणी व नेतंसा परिसरांत सुमारे पाचशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर करडईचा पेरा झाला आहे. कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या वतीने नवीन वाणांसह पेरणीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे.

मागील काही वर्षात बाजारपेठ व बाजारमुल्यामुळे करडई ही नामशेष होते की काय अशी शंका येऊ लागली होती. परंतु सन २०२० पासून कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन केंद्राच्या सहकार्याने करडईचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिके दिल्याने पिकाचा पेरा वाढला आहे. यावर्षी या भागात ५०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

भारतीय तेलबिया संशोधन संस्थे (हैदराबाद) च्या सहकार्यांने यावर्षी SAF -764 या वणांचे ५० प्रात्यक्षिके या दोन गावात घेण्यात आली आहेत. यामध्ये नवीन वाणाची ३० प्रात्यक्षिके, पूर्ण पॅकेजची ५ प्रात्यक्षिके, तण नियंत्रणाची ५ प्रात्यक्षिके, ड्रोन फवारणीची ५ प्रात्यक्षिके व यांत्रिकीकरणाची ५ प्रात्यक्षिके देण्यात आली होती. हे वाण उत्तम असून फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त दिसून आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना एकरी ७ ते १० क्विंटल करडई होण्याची अपेक्षित आहे.

Kardai Cultivation
Safflower, Sunflower Farming : पश्‍चिम विदर्भातील करडई, सूर्यफुलाची लागवड घटली

भेसळीच्या तेलाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणवू लागले असून लोकांना आरोग्यासाठी करडईचे महत्त्व पटू लागले आहे. उत्पादित होणाऱ्या मालावर प्रक्रीया करून तेल काढण्यासाठी वापरण्यात येणार आहे. शिल्लक राहणारी करडई शेतकरी बाजारपेठेत विकणार आहे.

तेलबिया संशोधन विभागाद्वारे पीडीकेव्ही व्हाइट या वाणाची २५ प्रात्यक्षिके सुद्धा घेण्यात आली होती. हा वाण सुद्धा अधिक उत्पादन देणारा असून कीड व रोगास साधारण प्रतिकारक आहे. परिणामी शेतकऱ्यांचा कल या वाणाकडे दिसून येत आहे. गोभणी, नेतांसा येथील निवडक शेतकऱ्यांना हे वाण देण्यात आले होते.

Kardai Cultivation
Safflower, Rabbi Jowar Production : करडई, रब्बी ज्वारीच्या उत्पादनात नांदेडचा राज्यात डंका

या वाणाची वैशिष्ठे म्हणजे यावर्षीच विद्यापीठाने प्रसारित केले असून अधिक उत्पादन देणारे आहे. करडई क्षेत्रवाढीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. भारत फरकाडे, तेलबिया संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. संतोष गहुकर, शेतकरी कंपनी अध्यक्ष संदीप बाजड व गोभणी येथील तज्ञ प्रशिक्षक संजय मांडवगडे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.

करडईला पाठबळाची गरज

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत करडईला बाजारमूल्य नसल्यामुळे शेतकरी या पिकाकडे दुर्लक्ष करीत होते. राजकीय यंत्रणा व बाजार समितीच्या पुढाकाराने चिया व हळदी प्रमाणे पांढऱ्या करडईसाठीही बाजारपेठ उपलब्ध करून किमान किमतीने खरेदी केल्यास करडईचे क्षेत्र वाढीला वेळ लागणार नाही. या भागातील सेंद्रिय शेतकरी गट व जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक गटांनी हे पीक वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

डॉ. फरकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या चार वर्षापासून करडईची लागवड करीत आहे. आरोग्यासाठी करडईचे तेल अधिक चांगले आहे. आहारामध्ये या तेलाचा वापर करीत आहे. जैविक खते आणि जैविक निविष्ठा स्वतः तयार करून पिकासाठी वापरत आहे. त्यामुळे शेतीमधून एक वेगळा आनंद मिळतो आहे.
- दुर्गादास खोडवे, शेतकरी तथा पोलिस पाटील, गोभणी, ता. रिसोड, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com