Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : मराठवाड्यातील पाणीसाठ्यात किंचित वाढ

Water Project : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पातील एकूण पाने साठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गत आठवड्यात १३ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा १९ जुलै अखेर १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पातील एकूण पाने साठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गत आठवड्यात १३ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा १९ जुलै अखेर १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अजूनही अनेक प्रकल्पांची तहान कायम असून त्यासाठी टप्प्याखाली मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात आत्ताच्या घडीला १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे मध्यम ७५ प्रकल्पात १० टक्के, लघु ७४९ प्रकल्पात ११ टक्के तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात १७ टक्के व तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यात ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या सात प्रकल्पात

२५ टक्क्यापेक्षा कमी पाणी

मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पांपैकी तब्बल सात प्रकल्पात २५ टक्क्यापेक्षा कमी, तीन प्रकल्पात २५ ते ५० टक्के तर केवळ एका प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या मोठ्या प्रकल्पात बीड व धाराशिवमधील प्रत्येकी दोन, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोलीतील प्रत्येकी एका मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे. शिवाय या मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव, मांजरा सीना कोळेगाव हे तीनही प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. सिद्धेश्वर प्रकल्पात केवळ दोन टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातही चार टक्केच उपयुक्त पाणी असून निम्न दुधनांमध्ये सहा टक्के उपयुक्त पाणी आहे.

३८ मध्यम व ३३१ लघु प्रकल्पाचा पाणीसाठा जोत्याखाली...

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील ११, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी ९, जालन्यातील ५, लातूरमधील ३ व नांदेडमधील १ मिळून ३८ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. याशिवाय ३३१ लघु प्रकल्पांचा पाणीसाठा ही जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये लातूरमधील ८४, धाराशिवमधील ७६, बीडमधील ६७, जालन्यातील ३८, छत्रपती संभाजीनगरमधील २७, नांदेडमधील २०, परभणीतील १० व हिंगोलीतील ९ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात केवळ तीन टक्के उपयुक्त पाणी शिल्लक असून ५७ लघु प्रकल्पात केवळ एक टक्काच उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात चार टक्के तर ९८ लघु प्रकल्पात सात टक्के उपयुक्त पाणी आहे. बीड जिल्ह्यातील १२६ लघु प्रकल्पात सात टक्के तर १६ मध्यम प्रकल्पात १५ टक्के उपयुक्त पाणी आहे.

लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात ११ टक्के तर १३४ लघु प्रकल्पात अकरा टक्केच उपयुक्त पाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील २०६ लघु प्रकल्पात १९टक्के व १७ मध्यम प्रकल्पात केवळ सात टक्के उपयुक्त पाणी आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात २१ टक्के तर ८० लघु प्रकल्पात १९ टक्के उपयुक्त पाण्याचा साठा आहे. परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पात सहा टक्के तर दोन मध्यम प्रकल्पात ११ टक्के उपयुक्त पाणी आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पात १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

३ मध्यम आणि ६१ लघु प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी जालना, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एक प्रकल्प अजूनही कोरडाच आहे. याशिवाय ७५० लघु प्रकल्पांपैकी तब्बल ६१ प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. यामध्ये बीडमधील २०, छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील १३, धाराशिवमधील ९ व लातूरमधील तीन लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

३८ मध्यम व ३३१ लघु प्रकल्पाचा पाणीसाठा जोत्याखाली...

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील ११, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी ९, जालन्यातील ५, लातूरमधील ३ व नांदेडमधील १ मिळून ३८ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. याशिवाय ३३१ लघु प्रकल्पांचा पाणीसाठा ही जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये लातूरमधील ८४, धाराशिवमधील ७६, बीडमधील ६७, जालन्यातील ३८, छत्रपती संभाजीनगरमधील २७, नांदेडमधील २०, परभणीतील १० व हिंगोलीतील ९ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT