Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : महिलांनी तयार करून दाखविली सोळा प्रकारची लोणची

Women Training : प्रशिक्षणात महिलांनी कैरी, लिंबू, मिरची, गाजर, कारली, शेवगा शेंग, ओळी हळद, मोड मेथी यापासून गोड, तिखट चवीची एकूण १६ प्रकारची लोणची प्रात्यक्षिकाद्वारे तयार करून दाखवली.

Team Agrowon

Jalna News : प्रशिक्षणात महिलांनी कैरी, लिंबू, मिरची, गाजर, कारली, शेवगा शेंग, ओळी हळद, मोड मेथी यापासून गोड, तिखट चवीची एकूण १६ प्रकारची लोणची प्रात्यक्षिकाद्वारे तयार करून दाखवली.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना अंतर्गत, गृहविज्ञान विभागामार्फत ग्रामीण महिला व युवतींकरिता चारदिवसीय कालावधीचा विविध प्रकारची लोणची तयार करणे या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम १३ ते १६ जून २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

व्यवसाय करण्याच्या दृष्टीने ग्रामीण युवती व महिलांकरिता विविध प्रकारची सध्या, सोप्या व पारंपरिक पद्धतीने तयार केलेली लोणची जी आरोग्यासाठी चांगली व पौष्टिक आहेत आणि ज्याला सध्या बाजारामध्ये भरपूर मागणी देखील आहे. याचाच विचार करून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे अन्नतंत्र विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. एस. एस. पाटील तसेच गृहविज्ञान तज्ज्ञ एस. एन. कऱ्हाळे यांची उपस्थिती होती.

या प्रशिक्षणात, तांत्रिक सत्रात विविध विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. यामध्ये अन्नतंत्र विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. एस. एस. पाटील यांनी ग्रामीण महिलांना करण्याजोगे विविध प्रक्रिया उद्योग त्याचे लेबलिंग व मार्केटिंग व याविषयी मार्गदर्शन केले.

उद्योग उभारणीसाठी महिलांची मानसिकता व उद्योजकीय गुण, या विषयावर प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी प्रकाश टाकला. कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील डॉ. साधना उमरीकर, विषय विशेषज्ञ गृहविज्ञान यांनी महिलांना लिंबू व मिरची यांपासून विविध प्रकारची लोणची प्रात्यक्षिकाद्वारे दाखवली.

अंतरवाला येथील यशस्वी उद्योजिका सौ. विद्या नारायण उजेड यांनी ग्रामीण पद्धतीने तयार करण्यात येणारी लोणची जसे की कारळ, तीळ, जवस व मोहरी या घटकांचा वापर करून तयार करून दाखवली. बँक ऑफ महाराष्ट्र आरसेटीचे कैलास तावडे यांनी उद्योग उभारणीसाठी बँक प्रस्ताव तयार करणे याविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रकल्प सहायक सौ. दीपाली दाभाडे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रकल्प याविषयी महिलांना अवगत केले. या प्रकल्पाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. समारोप प्रसंगी मृद्शास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. चौधरी यांनी महिलांनी विविध ठिकाणी स्टॉल व प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या लोणची उत्पादनाचा प्रचार व प्रसार करावा व विक्री करावी, असे सांगितले. या प्रसंगी कचरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी जाधव दांपत्य उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणात सिरसवाडी, खरपुडी, धारकल्याण व जालना येथील एकूण १७ महिला तसेच युवतींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन प्रा. कऱ्हाळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

Agriculture Method : पाणी, मातीची उत्पादकता वाढविणारी ‘पाच स्तरीय शेती’

Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार

SCROLL FOR NEXT