Farm Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Loan Waiver: साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

Financial Aid for Farmers: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१७ मध्ये शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली होती. मात्र, निकष पूर्ण करूनही ६.५६ लाख शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Amravati News: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. २०१७ मध्ये या संदर्भातील घोषणा झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांत निकषांची पूर्तता करुनही तब्बल ६.५६ लाख शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने तत्कालीन सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. या अंतर्गत लहान शेतकऱ्यांकडील दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचे प्रस्तावित होते. १ एप्रिल २००९ नंतर पीक तसेच मध्यम मुदत कर्ज घेतले असेल व ते ३० जून २०१६ रोजी थकीत असेल अशा शेतकऱ्यांचे मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपये माफ करण्यात येणार होते.

त्यानुसार वर्ष २०१८ पर्यंत ४०.२१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६,६६९.७५ कोटी रुपये जमा करण्यात आले. कर्जमाफीसाठी राज्यभरातील सुमारे ५०.६० लाखांवर शेतकरी पात्र ठरले होते. मात्र त्यातील काहीच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. गेल्या आठ वर्षांपासून तब्बल ६.५६ लाखांवर शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे धक्‍कादायक वास्तव आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना देखील शासनाकडून राबविण्यात आली होती. या माध्यमातून पात्र ३२.४२ लाख शेतकऱ्यांपैकी ३२.२७ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

असे होते निकष

कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी आधार, पॅन, बॅंक खात्याचा तपशील, सातबारा अशा बाबींची पूर्तता करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. त्यासोबतच सामूहिक सुविधा केंद्रांवर (सीएससी) नोंदणीची ऑनलाइन प्रक्रियाही पार पाडावी लागली होती.

प्रलंबित लाभार्थ्यांची सरकार घेतेय माहिती

राज्यात सहा लाखांवर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याची बाब सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात मान्य केली. जिल्हा तसेच राज्यस्तरीय बॅंकर्स समितीकडून पात्र व प्रलंबित लाभार्थ्यांची माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्जदारांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार होते. मात्र गेल्या आठ वर्षांपासून ६.५६ लाख शेतकरी निकषपूर्तीनंतरही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
सुलभा खोडके, आमदार, अमरावती मतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT