Farm Loan Waiver: शेतकरी समाधान सभेत कर्ज माफ करण्याची मागणी

Farmer Protest: महाराष्ट्र शेतकरी विकास मंचाच्या वतीने अकोल्यात आयोजित ‘शेतकरी समाधान सभेत’ कर्जमाफी, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती मदत आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या एकजुटीवर भर देत सरकारवर दबाव टाकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Farm Loan Waiver
Farm Loan WaiverAgrowon
Published on
Updated on

Akola News: महाराष्ट्र शेतकरी विकास मंचातर्फे येथे झालेल्या ‘शेतकरी समाधान सभे’त शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या सामूहिक कर्जमाफीच्या मागणीसह इतर मुद्द्यांचा समावेश आहे. या सभेला राज्यभरातून शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. सभेत शेतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यांच्या समाधानासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष महंमद सलीम इंजिनिअर होते. संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. सुनीलम, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे, शेतकरी विकास मंचाचे मार्गदर्शक इलियास खान फलाही, लक्ष्मीकांत कौठकर, जमीर कादरी, अब्दुल मुजीब, गजानन अमदाबादकर आणि शेतकरी विकास मंचचे अध्यक्ष हुसेन खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

Farm Loan Waiver
Farm Loan Waiver : उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज ‘राइट ऑफ’ करा; शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी

या वेळी तुपकर म्हणाले, ‘‘आपण संघटित राहण्याची गरज आहे. सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत. जर आपण एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला नाही, तर आपली मागणी मान्य केली जाणार नाही.’’

डॉ. सुनीलम यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या कार्यावर प्रकाश टाकला. सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील, तर सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Farm Loan Waiver
Farm Loan Waiver : तेलंगाणा सरकारने दिली चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफी

उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात विलास रावते (सावळेक्ष्वर, उमरखेड), बाळकृष्ण रामचवरे (आळंदा, जि. अकोला), रजा उल हक (अकोला), शुभम राजूरकर (हिंगणा फाटा, बार्शीटाकळी) यांचा समावेश होता.

...या विषयांवर घेतले ठराव

सभेत प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना २०२४-२५ साठी प्रति एकर १० हजार रुपयांचे तत्काळ अनुदान देण्यात यावे, २०२४-२५ साठी पीकविमा आणि नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांचे सामूहिक कर्ज माफ करावे, शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळावी यासाठी एसएसपी हमी कायदा करावा, अशा मागण्यांचे ठराव झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com