Sitafal  Agrowon
ॲग्रो विशेष

Sitafal Processing : सीताफळ संशोधन केंद्राचे प्रक्रियेच्या दिशेने पाऊल

Team Agrowon

Beed News : येथील सीताफळ संशोधन केंद्राची प्रक्रिया उद्योग उभारणीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमुळे आधी रोप कलम निर्मिती व आता प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य होत, असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.

अंबाजोगाई येथे १९९७ पासून सीताफळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. या सीताफळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर दहा हेक्टर मध्ये सीताफळाची सुमारे २३ वाण आहेत. सीताफळाचे मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग उभारणीची आवश्यकता असल्याची बाब वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शासनाकडे मांडण्यात आली होती.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून सीताफळ संशोधन केंद्राला मुख्यमंत्री सहायता निधीतून ३ कोटी ९२ लाखाचा निधी संशोधन व सीताफळाच्या मूल्यवर्धनासाठी मंजूर करण्यात आला होता. २०२३-२४ मध्ये त्यापैकी १ कोटी ३१ लाखांचा निधी प्राप्त झाला. त्यामधून प्रक्रिया युनिट उभारणीसाठी आवश्यक उपकरणांची खरेदी करण्यात आली.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील जवळपास एक कोटीचा निधीही प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर उरलेला निधी २०२५-२६ मध्ये मिळणार, असल्याचे डॉ. मुंडे म्हणाले. निधीतून प्रिक्युलिंग युनिट व उपकरणांची मांडणी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

त्यासाठी आवश्यक विजेची उपलब्धता होण्यासाठी स्वतंत्र रोहित्रची मागणी महावितरणला करण्यात आली आहे. येथे ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पातून प्रक्रिया सुरू करण्याचा आपला मानस असल्याचेही डॉ. मुंडे म्हणाले.

प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर सीताफळ पावडर कुल्फी व इतर मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातील. केंद्राच्या संपर्कातील शेतकऱ्यांकडून प्रक्रियेसाठी भविष्यात सीताफळाची खरेदी ही करता येईल. अशा पद्धतीने या प्रक्रिया उद्योगातील विद्यापीठाचा ब्रँड विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. गोविंद मुंडे, प्रमुख, सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT