Sindhudurg Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Farmers : कापणी सोडाच; शेतात जायचीच इच्छा मेली, कृषी विभाग पंचनाम्यालाही आलं नाही

Agriculture Department : नुकसानीनंतर विमा कंपनीकडे नुकसानीची सूचना नोंदविली. परंतु, एक महिना झाला अजूनही पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचा प्रतिनिधी पंचनाम्याकरिता आलेला नाही.

sandeep Shirguppe

Sindhudurg Paddy Crop Damage : शेणखत आणि रासायनिक खतांचा सुयोग्य वापर आणि उत्तम पाऊस यामुळे एका एका लोंबीला ३५० ते ४०० दाणे आले होते; परंतु पीक परिपक्व झाल्यानंतर परत झालेल्या पावसाने भात पीक जमिनीवर कोसळले. पिकाची लोंबीच चिखलात रूतली एवढेच नव्हे, तर पिकाला कोंब फुटले. त्यामुळे आता कापणी दूरच; परंतु शेतात जायची इच्छाच मेली. नापणे (ता. वैभववाडी) येथील भात उत्पादक शेतकरी रवींद्र गावडे हतबल होऊन बोलत होते. हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी रविंद्र गावडे म्हणाले की, भात पिकाचे क्षेत्र १ रुपयांमध्ये विमा सरंक्षित केले आहे. नुकसानीनंतर विमा कंपनीकडे नुकसानीची सूचना नोंदविली. परंतु, एक महिना झाला अजूनही पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचा प्रतिनिधी पंचनाम्याकरिता आलेला नाही. एवढेच नाही, तर साधी विचारपूसदेखील कृषी विभागाकडून करण्यात आली नाही.

जिल्ह्यातील नापणे (ता. वैभववाडी) येथील रवींद्र सुदाम गावडे हे खरिपात भात पीक, तर रब्बीमध्ये कलिंगड, मूग, चवळी यासह विविध पिके घेतात. अतिशय नियोजनबध्द ते शेती करतात. गेल्या वर्षी असंतुलित पाऊस असताना त्यांनी तीन एकरमध्ये आठ टन भात उत्पादन घेतले होते. त्यामुळे यावर्षी त्यांनी १२ टन उत्पादनाचे लक्ष ठेवले होते. तीन एकरच मशागत करताना त्यांनी एकरी पंधरा ते वीस ट्रॉली शेणखताचा वापर केला. ६ जूनला भातरोपवाटिका तयार केली. २५ जूनला भातरोप पुनर्लागवड केली. त्यानंतर तण नियंत्रण आणि खतांची मात्रा दिली.

यावर्षी सुरुवातीपासून भात पिकाला पोषक पाऊस झाल्याने पिकांची वाढ जोमदार झाली. सप्टेंबरच्या अखेरीपासून पीक परिपक्व होण्यास सुरुवात झाली. एका एका लोंबीला शंभर-दोनशे नाही, तर तब्बल ३५० ते ४०० दाणे होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पिकाची कापणी करण्याचे नियोजनदेखील त्यांनी केले. परंतु, ३ ऑक्टोबरपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.

वादळी वाऱ्यासह अनेकदा अतिवृष्टी झाली. २० ऑक्टोबरपर्यंत सतत पाऊस पडत राहिला. त्यामुळे संपूर्ण भात पीक जमिनीवर कोसळण्यास सुरुवात झाली. जसेजसे पीक जमिनीवर कोसळू लागले तसतशी श्री. गावडे यांच्या जीवाची घालमेल वाढू लागली. कधी दुपारनंतर, तर कधी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात व्हायची. त्यामुळे काय करावे, हे त्यांना सुचत नव्हते. त्यामुळे पाऊस थांबण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही नव्हते. या कालावधीत सर्व पीक जमिनीवर कोसळून पडलेल्या पिकाला कोंब फुटले. तीन एकरपैकी दोन एकर भात पीक पूर्णपणे जमिनीवर कोसळून नुकसान झाले.

पिकाची ही अवस्था पाहिल्यानंतर आतापर्यंत दररोज सकाळ, संध्याकाळ शेतात जाणाऱ्या श्री. गावडेंची भात पीक कापणी दूरच परंतु शेतातच जायची इच्छाच मेली आहे. जरी या पिकाची कापणी केली तरी कोंब आल्यामुळे त्यातून तांदूळ निघेल की नाही, याची शाश्वती नाही. हातातोंडाशी आलेला घासच पावसाने हिरावून घेतल्यामुळे श्री. गावडे अस्वस्थ आहेत. तीन एकर लागवडीसाठी मोठा खर्च त्यांनी केला असून, उत्पादन खर्च देखील पीक उत्पादनातून त्यांना मिळणार नाही, अशी स्थिती आहे. हीच स्थिती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची आहे. परतीच्या पावसाने अक्षरक्षः भात पीक उत्पादक उद्‌ध्वस्त झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT