Pre Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Rain Update : मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने गुरुवारी (ता. १६) जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

Team Agrowon

Sindhudurg News : मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने गुरुवारी (ता. १६) जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा तडाखा बसला असून, या गावातील १०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, जिल्ह्यात १५० हून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी एक वाजल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील काही गावांमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून विजांचा कडकडाट आणि वादळीवारा सुरू झाला.

डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा तडाखा बसला. त्यामुळे दाणादाण उडाली. या गावातील १०० हून अधिक घरांची पडझड झाली.

वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे, अरुळे यांसह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. करूळला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार देखील झाले. भुईबावडा, मांगवली, उंबर्डे या परिसरात देखील पावसाचा जोर अधिक होता. जोरदार वाऱ्यामुळे काजूची शेकडो झाडे उन्मळून पडली. आखवणे भोम पूनर्वसन गावठणातील शेकडो काजूची झाडे उन्मळून पडली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT