Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Research Center : उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून सिंदेवाही केंद्राचा सन्मान

Paddy Mechanization : सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राने धानपट्ट्यात यांत्रीकीकरणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता पुढाकार घेतला आहे.

Team Agrowon

Chandrapur News : धान बीजोत्पादन, धान बियाणे विक्री, जैविक घटक उत्पादन व विक्री, ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत शेतकऱ्यांना संदेश, भाडे तत्त्वावरील अवजारे बॅंक, प्रक्षेत्रावर यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन यासह शेतकरी हिताचे व्यापक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सिंदेवाही विभागीय कृषी संशोधन केंद्राला उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५६ व्या स्थापना दिन सोहळ्यात अकोला येथे आयजित सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. राकेशचंद्र अग्रवाल, कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते सिंदेवाही संशोधन केंद्राचे संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या वेळी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, नियंत्रक प्रमोद पाटील, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख यांची उपस्थिती होती.

सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राने धानपट्ट्यात यांत्रीकीकरणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता पुढाकार घेतला आहे. त्याकरिता खास अवजारे बॅंक उभारण्यात आली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पदरात शेतीकामी अवजारांची उपलब्धता करून दिली जाते.

त्याबरोबरच विद्यापीठद्वारे विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा याकरिता शेतकरी-शास्त्रज्ञ मंच यासारख्या व्यासपीठाचा प्रभावी वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे. संशोधन केंद्राच्या या वाटचालीत डॉ. अनिल कोल्हे, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, डॉ. नरेश कापसे, डॉ. मदन वांढरे, आशिष नागदेवे, लोपचंद डोंगरवार, गोपाल दांदळे यांचे योगदान राहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT