Fishery Business  Agrowon
ॲग्रो विशेष

Fishery Business : मत्स्य व्यावसायिकांसाठी डिजिटल नोंदणी कार्यशाळा

Fisheries : छत्रपती संभाजी नगरचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय वि. बा. शिखरे, लातूरचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय शि. ग. गाताडे, यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Team Agrowon

Chh. sambhajinagar News : मत्स्य व्यवसाय विभागामार्फत १४ ते २२ दरम्यान प्रधान मंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेअंतर्गत राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणीसाठी मत्स्य व्यवसाय विभाग, राष्ट्रीय मात्स्यिकी विकास मंडळ (NFDB) व सेवा केंद्र यांच्या माध्यमातून विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

याअनुषंगाने, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नाशिक विभागातील मच्छीमार, मत्स्यविक्रेते, मत्स्यकास्तकार, मत्स्य उद्योजक, योजनेचे लाभार्थी व मत्स्यव्यवसायाशी निगडित भागधारकांची नोंदणी करणे व त्यांचेपर्यंत योजनेची व्याप्ती, माहिती पोहोचविण्याकरिता रविवारी (ता. १६) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

छत्रपती संभाजी नगरचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय वि. बा. शिखरे, लातूरचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय शि. ग. गाताडे, यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबविण्यात आली. उपस्थित मच्छीमारांना योजनेमुळे होणारे लाभ, त्याचे महत्त्व सांगितले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर डॉ. मधुरिमा जाधव, यांनी प्रास्ताविक केले.

तसेच समन्वयक प्रशांत सोनवणे, सहायक संचालक, मत्स्यव्यवसाय डॉ. तरुणकुमार सिंग यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे योजनेची माहिती दिली. प्रशांत तमखाने यांनी नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर, लातूर व नाशिक विभागातील १३ जिल्ह्यांचे सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व इतर कर्मचारी तसेच सेवा केंद्राचे कर्मचारी आणि ८०० हून अधिक मच्छीमार/मत्स्यविक्रेते/ मत्स्यकास्तकार/ मत्स्य उद्योजक/ योजनेचे लाभार्थी/ व मत्स्य व्यवसायाशी निगडित भागधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोहिमेमार्फत मत्स्य व्यवसायाशी निगडित सर्व भागधारकांना नोंदणी प्रक्रिया, मंजुरी दर वाढविणे, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजनेतून कर्ज सुविधा, मत्स्यपालन विमा, अनुदान या सारख्या लाभांसाठी प्रोत्साहित करणेकरण्याबाबत माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक

Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव

Agri Department Tranfers Delay: आकृतिबंधाच्या आडून बदल्यांना खो; पात्रता, निकडीची कारणे असूनही कृषी विभागाकडून अडवणूक

Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा

Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली

SCROLL FOR NEXT