Forest Fire Himachal Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या कित्येक दिवसापासून उत्तराखंडमधील जंगले धुमसत आहेत. येथील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन दिवस रात्र काम करत आहे. यादरम्यान उत्तराखंडसारखीच स्थिती हिमाचलमध्ये निर्माण होताना दिसत आहे. येथे देखील अतिउष्णतेमुळे जंगलांना आग लागत आहे. यामुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आला असून आता आग शेतापर्यंत आली आहे. यामुळे प्रशासनाचे आग विझवण्याचे दावे फोल ठरले आहे. १ एप्रिलपासून रविवार (ता.१९) संध्याकाळपर्यंत राज्यातील ३,२९०. ३१ हेक्टर क्षेत्राची राख झाली आहे. येथे ४१८ आगीच्या घटनांची नोंद झाली असून घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

राज्य सरकारने जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर करण्याचे आश्वासन दिले होते. ते आता आश्वासनच असल्याचे समोर आले असून अशी कोणतीच व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसात राज्यात ३७ ठिकाणी जंगलाला आग लागल्या. यात ५८४.४७ हेक्टर जमिनीतील वनसंपदा धोक्यात आली आहे. 

यावरून भाजपने सोमवारी (ता.२१) काँग्रेसवर हल्लाबोल करताना राज्यातील जंगलांना लागलेल्या आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते महेंद्र धर्मानी यांनी, आगीमुळे जंगलांचे नुकसान होण्याबरोबरच प्राणी आणि पर्यावरणालाही गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.  याबाबत काँग्रेस सरकार गंभीर होण्याऐवजी केवळ निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे धर्मानी यांनी म्हटले आहे.

रेल्वे रुळापर्यंत पोहोचली आग

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील धरमपूर-कुमारहट्टी परिसरात जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे सोमवारी (ता.२१) रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी सकाळी ही आग धरमपूरजवळील रेल्वे रुळापर्यंत पोहोचली, त्यामुळे शिमल्याच्या दिशेने जाणाऱ्या पाच गाड्या उशिराने सोडाव्या लागल्या. 

कोण कोणत्या रेल्वे 

प्रवाशांच्या सुरक्षा कारणाणे कालका-शिमला एक्स्प्रेस, कालका-शिमला स्पेशल रेल्वे हॉलिडे स्पेशल रेल्वे गाड्या टाकसाळ, कोटी, धरमपूर आणि संवारा स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. 

उपग्रह आणि ड्रोनची मदत 

यावरून पीसीसीएफ राजीव कुमार यांनी सांगितले की, एका विभागात ६-६ ठिकाणी आग लागली. वनविभाग तत्परतेने काम करत आहे. उपग्रह आणि ड्रोनच्या माध्यमातूनही जंगलातील आगीवर लक्ष ठेवले जात आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत वनविभागाचे कर्मचारी आग विझवण्यात व्यस्त असून गावातील लोक देखील सहकार्य करत आहेत. तसेच अधिक लोकांनी यात सहभाग घ्यावा असेही आवाहनही त्यांनी केले आहे.

नवीन फळबागा जळून खाक 

सोलन जिल्ह्यातील चौल, कांदाघाट, सोलनसह धरमपूर परिसरातील जंगलांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत या जंगलांतील आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. चौल परिसरात शेतकऱ्यांच्या नवीन फळबागांसह त्यांच्या भाजीपाला बागा जळून खाक झाला. 

कोटला मोलार जंगलात भीषण आग 

उत्तराखंडपाठोपाठ आता हिमाचल प्रदेशातील जंगले पेटू लागली आहेत. येथील सिरमौरमधील कोटला मोलार जंगल गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत गावकरी जीव धोक्यात घालून जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या आगीत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर जंगलात जनावरांसाठी चारा शिल्लक नाही. तर घनदाट पाइन जंगलातून वीजवाहिनी जाते. यातून ठिणग्या पडल्याने आग लागते. यावर वीज मंडळावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

ठिय्या आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

तसेच राज्यातील वनविभागाला कुंभकर्णाची झोप असून जंगलाला लागलेल्या आगीमुळे वनसंपत्ती नष्ट होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच पंडित जगदीश भारद्वाज यांनी केला आहे. तसेच जंगलातून गेलेली वीजवाहिनी जंगलातून काढून पणार कोटला मोलार रस्त्यावरून घ्यावी असे अनेकदा निवेदन केले होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार केली होती. मात्र  मंडळाच्या दुर्लक्षामुळेच आज जंगल पेटत आहे. यामुळे मंडळाने गावातील लोकांची विनंती ऐकून मागण्या पूर्ण न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT