Nashik News: ‘‘ एलपीजी गॅस ६० रुपयांनी महाग करून भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ झालेली आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने ही दरवाढ तत्काळ रद्द करावी, तसेच एलपीजी गॅससंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांशी चर्चा करून संसदेत निवेदन करावे,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. १३) येथे केली..शुक्रवारी काँग्रेसकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, ‘‘ देशातून गॅस सिलिंडर गायब आहेत, तर संसदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब आहेत. .LPG Gas Cylinder Price: प्रशासनाच्या सारवासारवीनंतरही घरगुती गॅस टाकीची चढ्या दराने विक्री.नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पसमोर सरेंडर झाले आहेत, त्याची मोठी किंमत सामान्य माणसाला मोजावी लागत आहे. घरातून गॅस गायब आहे, तर व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने छोटे व्यवसाय, हॉटेल्स, खाणावळी बंद कराव्या लागत आहेत. राज्यातील भाजप महायुती सरकार ‘लाडक्या बहिणीं’ना १५०० रुपये दिल्याचा ढोल पिटत असते, पण दुसरीकडे मात्र महागाई वाढवून या लाडक्या बहिणींची लूट करत आहे..LPG Cylinder Booking: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल; डिलिव्हरीमधील अंतर २१ दिवस.सपकाळ यांनी या वेळी गॅस वितरकांच्या कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच, गॅस सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून गॅसटंचाईबद्दल त्यांच्या भावना जाणून घेतल्या..ठिकठिकाणी आंदोलनेनागपूर, पुणे, ठाणे, वर्धा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, पालघर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, धाराशिव, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, ठाणे, पनवेलसह सर्व जिल्ह्यांत गॅस दरवाढ व टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले, अशी माहिती यावेळी काँग्रेसकडून देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.