Sericulture Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Farming : रेशीम कीटक नाजूक, बारकाईने करतो देखभाल

Sericulture Production : आमच्या घरात एकूण दहा जण. त्यातील सहा जण तरी रोज शेतात असतात. पूर्वी आमची कपाशी, मका अशी मुख्य पिके होती. पण खर्च वाढत चालला होता आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढत नव्हते.

Team Agrowon

Sericulture Farming Management

शेतकरी नियोजन

रेशीमशेती

नाव : देवीदास नारायण जाधव

गाव : शिऊर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : ५ एकर.

तुती क्षेत्र : ४ एकर.

अन्य पिके : मका, कापूस.

आमच्या घरात एकूण दहा जण. त्यातील सहा जण तरी रोज शेतात असतात. पूर्वी आमची कपाशी, मका अशी मुख्य पिके होती. पण खर्च वाढत चालला होता आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढत नव्हते. उत्पन्नाची हमी देणारा व्यवसाय म्हणून रेशीम व्यवसायाची माहिती मिळाली. २०१५ मध्ये रेशीम शेती सुरू केली. त्यात उत्पन्न मिळू लागल्यानंतर सुरुवातीला एक एकर असलेले तुती क्षेत्र वाढवत आता चार एकरांवर नेले आहे. बघता बघता तुती हे आमचे मुख्य पीक झाले असून, रेशीम शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनले आहे.

नियोजनातील महत्त्वाचे...

रेशीम कीटक हा नाजूक असून, त्याची देखभाल बारकाईने करावी लागते. येणाऱ्या कीड- रोग जाणून घेण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी बारकाईने केलेले निरीक्षण उपयोगी पडते.

टप्प्याटप्प्याने वाढवली तुती लागवड

सुरुवातीला १ एकर क्षेत्रात पाच बाय दोन फूट अंतरावर तुतीची लागवड केली. दुसऱ्या टप्प्यात २ एकर क्षेत्रात ६ बाय २ फूट क्षेत्रावर तुती लावली. तिसऱ्या टप्प्यात १ एकर क्षेत्रावर ४ बाय २ फूट अंतरावर तुती लागवड केली. बागेच्या व्यवस्थापनामध्ये मे महिन्यात खरड छाटणी करून नंतर आंतरमशागत केली जाते. नंतर शेणखत भरून घेतले जाते. अनुभवानुसार तुतीमध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हिवाळ्यात होतो. विहिरीतून सिंचनासाठी पाण्याची केली सोय केली असून, कार्यक्षम पाणी वापरासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करत आहे. त्यामुळे बागेतून दर्जेदार पाल्याचे उत्पादन मिळत राहते.

रेशीम कोष उत्पादन

तुती लागवड केल्यानंतर कोष उत्पादन २०१६ जुलैपासून सुरू झाले. अक्षरशः जनावराच्या रिकाम्या गोठ्यात ७५ अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली. रेशीम उद्योगातून परिस्थिती बदलत गेली. आता २२ बाय ५० फूट लांबीची दोन शेड उभी आहेत. त्यामुळे वर्षाकाठी किमान आठ ते नऊ बॅच असे अखंड रेशीम कोष उत्पादन घेणे शक्य होत आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी कोणतीही बॅच घेण्याआधी १५ दिवस शेडमध्ये बुरशीनाशकाच्या फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले जाते. एकेक बॅच २५० अंडीपुंजाची असते. त्यासाठी सुमारे १० ते १२ हजार रुपये प्रति बॅच खर्च येतो. कोष उत्पादन किमान २०० किलो होते. आजवर मिळालेल्या बाजार भावानुसार कोषाला ३०० ते ५०० प्रति किलो दर मिळाला आहे.

मिनी चॉकी सेंटर

आमच्या परिसरात शेतकऱ्यांना रेशीम चॉकी मिळत नव्हती. त्यामुळे २०१९-२० मध्ये मी बाल कीटक संगोपनगृह सुरू केले. आज आमच्या जिल्ह्यासह जवळच्या बीड, जळगाव व नगर इ. जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांना दरवर्षी चॉकी पुरवठा करतो. मिनी चॉकी सेंटरचा विस्तार करण्याची खूप इच्छा असली तरी रेशीम उद्योगामुळे व्यस्ततेमुळे शक्य होत नाही.

तुती बाग व शेडमधील सध्या केलेली कामे

आताच्या घडीला तुतीची ५ ते ६ फुटांपर्यंत वाढ झाली आहे.

साधारणतः पंधरवड्यापूर्वी रेशीम शेडचे निर्जंतुकीकरण करून नुकतीच बॅच सुरू केली आहे.

तुती बागेमध्ये आंतरमशागत केली आहे.

पुढील नियोजन

ही बॅच पूर्ण निघून गेल्यानंतर प्रथम तुती बागेची छाटणी केली जाईल.

नंतर गळफांदी कापणे, बैलाच्या साह्याने आंतरमशागत करणे ही कामे केली जातील.

रेशीममध्ये शिल्लक राहिलेल्या तुतीच्या काड्या, रेशीम किटकाची विष्ठा हे घटक कुजवून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्यासाठी एक खड्डा तयार केला असून, त्यात हे सेंद्रिय पदार्थ टाकल्यानंतर वेस्ट डी कंपोजर वापरले जाते. त्यामुळे ते वेगाने आणि चांगले कुजते. या खताचा वापर पिकासाठी केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT