Unseasonal Rain Hits Vidarbha, Marathwada And Konkan: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नागपूर, भंडारा आणि गोंदियात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः गहू, हरभरा पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे..मराठवाड्यातील धाराशिवसह हिंगोलीत सोमवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. लातूर शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे..यवतमाळ: गहू पिकाचे मोठे नुकसान यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोंदरी, वाकण परिसराला रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे उभे पीक आडवे झाले आहे. दोन दिवसांपापूर्वी हवामान विभागाने विदर्भात ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज तंतोतत खरा ठरला आहे..Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता.गोंदियातील गोरेगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. हा पाऊस रब्बी हंगामातील धान पिकांसाठी चांगला मानला जात असला तरी बागायती पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे हरभऱ्यासारख्या कडधान्ये पिकाचे नुकसान होऊ शकते..बाजार समितीमधील धान्याची पोती भिजलीनागपूरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याची पोती पावसाने भिजली आहेत. येथे तूर, सोयाबीन धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात सोमवारी (ता. २३) वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..Weather Update: विदर्भात उन्हाचा चटका वाढला; उत्तर भारतातील थंडी कमी होऊन तापमानात वाढ.कोकणात काजू, आंबा पिकाला धोकाकोकणातील काजू आणि आंबा पिकाला आधीच हवामान बदलाचा फटका बसला आहे. काजू, आंब्याचा मोहर करपला असल्याने बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. तर आता अवकाळी पावसाने काजू, आंबा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीत रविवारी पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी पावसामुळे फळ गळती झाली असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील फोंडाघाट परिसरात रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास पाऊस झाला..तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य, चंदगड, आजरा तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला. यामुळे लोकांची धावपळ उडाली. .गोव्यातही पावसाचा तडाखागोव्यातील सत्तरी तालुक्यात रविवारी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे येथील काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.