Pune News: शेतीमाल खरेदी-विक्रीची शेकडो कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतीमालाच्या चोऱ्यांनंतर आता अडत्यांच्या गाळ्यांनाही चोरांनी लक्ष्य केले आहे..शुक्रवारी (ता. २०) रात्री सुमारे आठ वाजता मे. जगदीश पायगुडे यांच्या गाळ्यातील पेटी फोडून १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या निषेधार्थ मर्चंट्स चेंबरने बुधवारी (ता. २५) बंदचे आवाहन केले आहे..Pune APMC Theft : पुणे बाजार समितीमधील चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त.या प्रकरणी पायगुडे यांनी तक्रार केली असता, ‘‘रोख बाळगण्याचे प्रयोजन काय?’’ असा सवाल सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..Agriculture Theft: धाराशिव जिल्ह्यातील गावशिवारांत चोरट्यांचे राज्य.बाजार आवारातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासन आणि सुरक्षा एजन्सी यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत चोरीची रक्कम संबंधित सुरक्षा एजन्सीकडून वसूल करण्याचे ठरले होते. एजन्सीने रक्कम न दिल्यास प्रशासनाने चोरट्यांना जेरबंद करून रक्कम परत द्यावी, अशी मागणी पायगुडे यांनी केली आहे..अडत्यांनी आपल्या जवळील रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवजाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्यावी. शनिवारी (ता. २१) बाजार बंद असताना शुक्रवारी (ता. २०) रोख रक्कम गाळ्यात ठेवणे योग्य नाही. झालेल्या चोरीचा तपास केला जाईल.डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.