Silk Cocoon Production Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Cocoon Production : आरक्षणासाठी बीड बंद! बाजार समितीही बंद असल्याने १० ते १२ टन रेशीम कोष शेतावरच अडकला

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला आता राज्यभर पाठिंबा मिळत आहे. तर पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात शनिवारी (ता.२१) बंदची हाक दिली. यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहारांसह बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे बाजार समितीत शनिवारी होणारे रेशीम कोषचे व्यवहार थांबले.

सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशा मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज एकवटला आहे. आज बंदची हाक देण्यात आली असून बीड बाजार समितीत होणारे रेशीम कोष खरेदी देखील थांबली आहे. त्यामुळे अनेक रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी या बंदला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी देखील केली आहे.

राज्यात बीड बाजार समिती रेशीम कोश खरेदीसाठी महत्वाची मानली जाते. येथे १० ते १२ टन रेशीम कोष खरेदीसाठी येतो. बीड, पुणे, बारामती, इंदापूर, नाशिक, जळगाव, जालना, नगर, परभणी जिल्ह्यातील रेशीम कोश येथे शेतकरी आणतात. पण शनिवारी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढलेले रेशीम कोष शेतावरच अडकले.

बीड उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते. सध्या बाजारात १० ते १२ टन रेशीम कोषची आवक होत असते. यामुळे बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. दर सामान्य राहिल्यास कमीतकमी ५० ते ५५ लाख रूपयांची उलाढाल होते. तर दर चढ राहिल्यास किमान १ कोटींपर्यंत उलाढाल होत असते, अशी माहिती बीड बाजार समितीतील संचालक धनंजय गुदेकर यांनी दिली आहे. पण शनिवारी होणारे व्यवहारच थांबले आहेत. त्यात रविवारी देखील बाजार समितीला सुट्टी असल्याने रेशीम कोष उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच रविवारी बाजार समिती सुरू ठेण्यासाठी हालचाली सुरू आहेत, असेही गुदेकर यांनी म्हटले आहे.

रेशीम कोश नाशवंत असल्याने खेरदी झाली नाही. तर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रविवारी (ता.२२) बाजार समितीत रेशीम बाजार सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. रविवारी बाजार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणाचा प्रयत्न समितीचा आहे.
-धनंजय गुदेकर, संचालक बीड बाजार समिती
राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन केली जात आहेत. याआधी देखील अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत. पण यावर सरकारने योग्य तोडगा काढलेला नाही. त्यामुळेच आता पुन्हा एकदा उपोषण करावे लागत आहे. सरकारने आता यावर तोडगा काढवा. समाजाला आरक्षण द्यावे. रेशीम कोश उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.
-विक्रम तांब्रे, रेशीम कोश उत्पादक शेतकरी

पुणे, परभणी आणि जालना रविवार बंद

जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिव जिल्ह्यात शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. रविवार (ता.२२) पुणे, परभणी आणि जालन्यात जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT