Silk Market : रेशीम कोष विक्रीसाठी बाजार समितीमध्येच आणण्याचे आवाहन

Baramati APMC : पुण्यासह इतर जिल्ह्यातून रेशीम कोष उत्पादक शेतकरी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष विक्रीस आणत आहेत.
Silk Cocoon Market
Silk Cocoon MarketAgrowon
Published on
Updated on

Baramati News : पुण्यासह इतर जिल्ह्यातून रेशीम कोष उत्पादक शेतकरी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष विक्रीस आणत आहेत. परंतु खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असतानाही काही व्यापारी परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून दर ठरवून कोष खरेदी करीत आहेत. असे बाजार समिती प्रशासनास आढळून आले आहे.

विनापरवाना व परस्पर माल खरेदी करणे बेकायदेशीर आहे. असा प्रकार आढळून आल्यास कोष वाहनासह जप्त करण्यात येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने रेशीम कोष खरेदी-विक्री खुली बाजारपेठ केंद्र सुरू आहे.

Silk Cocoon Market
Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

रेशीम कोष मार्केटमध्ये ई-नामद्वारे ऑनलाइन पद्धतीने लिलाव होत असल्याने योग्य दर, अचूक वजन व वेळेत व खात्रीशीर पेमेंट मिळत असल्याने रेशीम कोष मार्केटमध्ये पारदर्शक व्यवहार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची विश्वासार्हता वाढत चालली आहे.

Silk Cocoon Market
Silk Cocoon Market : रेशीम कोषाला प्रतिकिलो ३१० ते ४९५ रुपये दर

शेतकऱ्यांना वेळेत ऑनलाइन पेमेंट मिळत असल्याने परिसरातील व शेजारील जिल्ह्यातील अनेक रेशीम उत्पादक शेतकरी येथे कोष विक्रीसाठी आणत असतात. रेशीम कोष हा शेतमाल शासनाने नियमनात आणला असल्याने याचा समाविष्ट बाजार समितीच्या नियमात येत आहे.

फसवणूक टाळण्यासाठी कोष समितीतच विक्रीस आणावा

रेशीम कोष ज्यांना खरेदी करावयाचे आहेत, त्यांनी परवाना घेण्यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यासाठी पाच हजार परवाना फी डिपॉझिट, अर्ज, साधार कागदपत्र घेऊन परवाना देण्यात येईल.

रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आपला माल बारामतीच्या रेशीम कोष मार्केटमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार, उपसभापती नीलेश लडकत व सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com