Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : मॉन्सूनची स्वारी आज महाराष्ट्रात येण्याचे संकेत

Team Agrowon

Monsoon : पुणे ः ‘मॉन्सून’चे महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे. गोव्यात दाखल होत मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आज (ता. ६) मोसमी वारे तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

राज्यात मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. आज (ता. ६) राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमान कमी होत आहे. बुधवारी (ता.४) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे उच्चांकी ४२.५ अंश तापमानाची नोंद झाली.
कर्नाटक किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असून, अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा वाढला आहे. आज (ता. ६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी होऊन, ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :
कोकण : मुलदे ४०, गुहागर, कुडाळ, संगमेश्वर प्रत्येकी १०.
मध्य महाराष्ट्र : लोणावळा ८०, कसबे डिग्रज, पुणे शहर प्रत्येकी ७०, सांगली ६०, तासगाव, कडेगाव प्रत्येकी ५०, इंदापूर, भडगाव प्रत्येकी ४०, पलूस, जत, चिंचवड, मिरज, सोलापूर, सासवड, जेऊर प्रत्येकी २०.
मराठवाडा : गंगापूर २०, निलंगा, उमरगा, सोयगाव, परभणी प्रत्येकी १०.
विदर्भ : चिखलदरा, जळगाव जामोद प्रत्येकी ४०, शेगाव, नंदूरा प्रत्येकी ३०, संग्रामपूर, अकोट प्रत्येकी २०, हिंगणघाट, परतवाडा, आमगाव, तेल्हारा, सेलू, नरखेड, बार्शीटाकळी, मलकापूर प्रत्येकी १०.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT