sandeep Shirguppe
जून महिना संपत आला तरी मॉन्सूनचे आगमन न झाल्याने शेतकऱ्यांसह सगळेच आभाळाकडे आस करून पाहत असल्याचे जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
हवामान खात्याकडून मॉन्सूनबाबत एक महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. आजपासून (ता. २२) कोकणात पावसाला सुरुवात होईल. तर विदर्भात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे.
बिपरजॉय चक्रिवादळामुळे मॉन्सूनचे आगमन लांबल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली, परंतु वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी मॉन्सूनची अद्यापही काही हालचाल नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान कोकणातील काही जिल्ह्यात पावसाला पोषक वातावरण होत आहे. परंतु राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सध्या मॉन्सूनची वाटचाल मध्य उत्तर प्रदेशातून सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच दक्षिण पंजाबपासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
मॉन्सूनने सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागात वाटचाल केली आहे.
देशातील पूर्व आणि पश्चिमेकडील राज्यात आसाम, मेघालयासह पूर्वोत्तर राज्य आणि पश्चिम बंगाल मध्ये मॉन्सून दमदार कोसळत आहे.
केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात काही ठिकाणी ५० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.