Shoumika Mahadik agrowon
ॲग्रो विशेष

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांचा रस्त्यावरच्या लढाईचा इशारा, गाय दूध खरेदी दर कपातीवरून आक्रमक

Gokul Milk Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात कपात केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी याविरोधात रस्त्यावर उतरला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Jhilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात कपात केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी याविरोधात रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान यावर गोकुळमध्ये विरोधी गटात असणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही आता यामध्ये उडी घेतली आहे. काल (ता.१७) महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळमधील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविषयी थेट आक्षेप घेतला.

यावेळी महाडिक म्हणाल्या, संचालकांवर होणारा ३० लाखांचा खर्च ५० लाखांवर गेला आहे. संघाच्या जीवावर स्वतःच्या चैन्यांसाठी शेतकऱ्यांचे खिसे कापणे बंद करून कपात केलेला गाय दूध दर पुन्हा वाढवून दिला पाहिजे. दर वाढवला नाही तर शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढली जाईल. सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांनी काटकसर करून कपात केलेली रक्कम गेली कोठे,' असा सवाल गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

शेतकरी स्वतः आंदोलन हातात घेत आहेत. दूध उत्पादकांनीही संघाच्या कार्यालयाची मोडतोड न करता रास्त मागणी आपला दर मिळवला पाहिजे. ३०-३५ वर्षांच्या काळात आम्ही संघ तोट्यात आहे, अशी कारणे सांगून शेतकऱ्यांचा खिसा कापला नाही. गोकुळचे पदार्थ सर्वात दर्जेदार आहेत. सर्व व्यवहार रोखीने होतात. सत्ताधाऱ्यांचे नेते काटकसर करून पैशांची बचत केल्याचे सांगत आहे. ही बचत केलेली रक्कम गेली कोठे ? असा सवालही महाडिक यांनी केला.

'सत्ताधाऱ्यांना गाय दुधाचा कपात केलेला दर वाढवायचा नाही. इतर संघांपेक्षा गोकुळचा दर जास्त असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, इतर संघांपेक्षा जिल्ह्यात दूध उत्पादकांची गोकुळसोबत नाळ जोडली आहे.

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी दूध खरेदी दर वाढवला असतानाही विक्री दर वाढवला नाही. त्यानुसार बाहेरील राज्यातील दूध खरेदीचे दर कमी करून केवळ कोल्हापूर जिल्ह्यात कपात केलेला दर वाढवला पाहिजे.

27 लाख पॅकेजचा अधिकारी काय कामाचा

निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला २७ लाखांचे पॅकेज देऊन पुन्हा मार्केटिंगसाठी आणले आहे. शेतकऱ्यांना दोन रुपये वाढ देता येत नाहीत, मात्र ज्या अधिकाऱ्यामुळे कोणताही फायदा होणार नाही, असा अधिकारी कोणाच्या फायद्यासाठी आणून बसवला आहे,' असा सवालही महाडिक यांनी केला.

संघातील भेटीगाठी किंवा इतर कामानिमित्त येणाऱ्या अधिकाऱ्यांना एका हॉटेलमध्ये थांबवण्याची नवीन प्रथा सुरू केली आहे. त्याच हॉटेलमध्ये राहून संघाचे काय भले होणार आहे?,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

गाय दूध दर कपात केल्यापासून दुधाचे संकलन घटले नाही. याउलट १५ हजार लिटरने वाढले असल्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले; मात्र हे कोल्हापूर जिल्ह्यात किती वाढले, हे सांगितले नसल्याचेही महाडिक यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT