Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापूस विकावा की साठवून ठेवावा?

Cotton Rate : शेतकरी द्विधा मनःस्थितीत; मागील वर्षापासून दरात घसरण सुरू

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः तीन वर्षांपूर्वी कापसाच्या दराला झळाळी मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा कपाशी लागवडीकडे वाढला. मात्र मागील वर्षापासून दर घसरणीला झालेली सुरुवात थांबलेली नाही. सध्या अवघा सहा हजारांपासून साडेसात हजारांदरम्यान दर असून, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. बाजारात सध्याची आवकही प्रभावित झालेली आहे. दराच्या अपेक्षेने कापूस किती दिवस ठेवावा व कधी विकावा, अशी द्विधा मनःस्थिती बनलेली आहे.

सध्या या दरांमध्ये वाढीची लक्षणे कुठेही दिसून आलेली नाहीत. बाजारात साडेसहा ते साडेसात हजारांदरम्यान कापूस विकतो आहे. खेडा खरेदी तर अवघी सहापासून केली जात आहे. दरवाढीची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत असल्याने शेतकरी कापूस विकावा की आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी या चिंतेत आहे. यंदा असमतोल पावसामुळे कापूस उत्पादनाला फटका बसलेला आहे. नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या पावसात हजारो क्विंटल कापूस भिजला होता. यामुळे कापसाचा दर्जाही खालावला. बाजारात हा कापूस जेमतेम दराने खरेदी झाला.

सध्याचा चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही सध्या साडेसहा ते साडेसात हजारांदरम्यान विकतो आहे. मागील तीन वर्षांतील दरांची स्थिती पाहिली तर मागील वर्षात डिसेंबर जानेवारीत ८००० ते ८२०० पर्यंत दर मिळत होते. तर त्याआधीच्या वर्षात कापसाला झळाळी असल्याने १० हजारांपर्यंत या काळात दर सुरू होता. पुढे हाच दर १२ हजारांवरही पोहोचला. दोन वर्षांत तब्बल ५ हजारांनी आता कापसाचा दर खाली आलेला दिसत आहे. या वर्षी लांब धाग्याच्या कापसाला ७०२० रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली आहे. परंतु महागलेली वेचाई, व्यवस्थापनाचा वाढलेला खर्च यामुळे कापूस पीक तोट्याचा सौदा ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कापसाचा डिसेंबर-जानेवारीचा दर
वर्ष---सरासरी भाव
२०२२---१० हजारांपर्यंत
२०२३---८२०० ते ८३०० रुपये
२०२४---६५०० ते ७५००

..

कापूस उत्पादनाचा खर्च भरमसाट वाढत असताना तुलनेने दर कमी मिळणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक ठरते आहे. सध्याच्या दराने कापूस न विकता बहुसंख्य शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली आहे. येत्या काळात दर वाढतील अशी अपेक्षा ठेवलेली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सध्याच्या दरात १० टक्के वाढीचे अंदाज दिलेले आहेत.
- दिलीप ठाकरे, प्रगतिशील कापूस उत्पादक, मालवाडा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणासह, नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

Soybean Crop Damage : सततच्या पावसाने सोयाबीन पीक धोक्यात

Online Electricity Bill : सव्वातीन लाख ग्राहकांची वीजबिले ऑनलाइन

Humani Attack : हुमणी अत्यंत घातक कीड असल्याने एकात्मिक नियंत्रण करा

Bamboo Cultivation : सातारा जिल्ह्यात बांबूची ११०० हेक्‍टरवर लागवड

SCROLL FOR NEXT