Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : राजगड तालुक्यात शेतमजुरांची टंचाई

Paddy Farming : राजगड तालुक्यामध्ये सध्या भात कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. पावसाच्या सावटाखाली सध्या काढणीला वेग आला आहे.

Team Agrowon

Velhe News : राजगड तालुक्यामध्ये सध्या भात कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. पावसाच्या सावटाखाली सध्या काढणीला वेग आला आहे. त्यातच मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांची पावले हे शेताकडे वळली आहेत. कडक पडलेल्या उन्हामुळे अनेक ठिकाणची भात खासरे काढणी योग्य झाली आहेत. मात्र परतीच्या पावसाचे पाणी भात खासरात साचले आहे. शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी चारी काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी पाणी नसलेल्या भात खाचरांमधून भात कापणीला सुरू आहे.

तालुक्यातील आंबवणे, करंजावणे, वांगणी पंचक्रोशी, सोंडे परिसर, दामगुडा आसनी, मंजाई आसणी,सुरवड, कोदवडी, मार्गासनी, किल्ले राजगड परिसरातील गावांमधून तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या अठरागाव मावळ पासली खोऱ्यामध्ये भात कापणीला प्रमाणात सुरुवात झाली आहे. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास राजगडवासीयांची दीपावलीही भात शेतीची कामे उरकण्यासाठी जाणार असल्याचे चित्र सध्या आहे.

राजगड तालुक्यामध्ये अद्यापही पावसाचे सावट असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे मजूर उपलब्ध आहेत ते भात कापणी करताना दिसून येत आहे. मात्र ज्यांच्याकडे मजूर उपलब्ध नाहीत ते पडकील वारंगुळ्यावर भर देत आहेत. एकाच वेळेस अनेकांचे भात काढण्यासाठी योग्य झाले असल्याने काही ठिकाणी शेतकरी एकमेकांच्या शेतामध्ये जाऊन भात कापणी करताना दिसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT