Sugarcane Burn Short Circuit agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Sugarcane : निष्कर्षानुसार आग कशामुळे लागली, याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही

sandeep Shirguppe

Sangli Shirala Sugarcane : सांगली जिल्ह्याज्या शिराळा तालुक्यातील बिकर येथील राजेंद्र बाळकू पाटील यांच्या सोनटक्के वस्तीशेजारी असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळ ११ के. व्ही. च्या उच्च दाब वाहिनीचे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन एकरातील ऊस व ठिबक संच जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना (ता.०१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बिऊर येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र पाटील यांची सोनटक्के वस्तीशेजारी शेती आहे. सकाळी शामराव कोतवाल हे राजेंद्र पाटील यांच्या शेताजवळ असणाऱ्या परिसरात काम करत होते. कोतवाल यांना पाटील यांच्या उसाच्या शेतातून आग लागल्याने धूर येत असल्याचे दिसले. त्यावेळी कोतवाल यांनी याची माहिती राजेंद्र पाटील यांना दिली.

पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र भर दुपार असल्याने उन्हाच्या झळा व वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. उसाच्या प्रत्येक सरीत पालाकुट्टी असल्याने व प्रत्येक उसाच्या सरीत 'ठिबक'च्या दोन पाईप असल्याने आगीचा भडका वाढला.

आग आटोक्यात येत नसल्याने शेजारी असलेल्या विश्वास कारखान्याची अग्निशमन गाडी पाठवून दिल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली. पालाकुट्टीमुळे आग लवकर नियंत्रणात न असल्याने 'स्प्रिंकलर'च्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सायंकाळी साडेसहापर्यंत प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, वायरमन रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उद्या मिरज येथील विद्युत निरीक्षकांसमवेत घटनास्थळी पुन्हा भेट देऊन पाहणी केली जाईल. त्यांच्या निष्कर्षानुसार आग कशामुळे लागली, याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. असे एल. बी. खटावकर उपकार्यकारी अभियंता, शिराळा यांनी सांगितलं

चांगले खत तयार होऊन शेतात गारवा मिळण्यासाठी दोन एकर उसात पालाकुट्टी केली होती. प्रत्येक सरीत चांगल्या गुणवत्तापूर्ण दोन पाईप टाकून ठिबक केले होते. मात्र शॉर्ट सर्किटमुळे दोन लाखांच्या ठिबक पाईप व तीन लाखांचा ऊस असे पाच लाखाचे नुकसान झाले. 'महावितरण' ने यासंदर्भात लक्ष देणे गरजेचे होते. - राजेंद्र पाटील प्रगतिशील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

Illegal Sand Excavation : वाळूसाठी ‘गिरणा’वरील बलून बंधारे दुर्लक्षित

Organic Certification : पदवीधरांसाठी सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरण हे उभरते सेवाक्षेत्र

SCROLL FOR NEXT