Geographical Indication Agrowon
ॲग्रो विशेष

GI Certification : शिवनेरी हापूस, अकोला कागदी लिंबू, अमरावती चणा, पिंपळीला ‘जीआय’ स्‍वीकृती

GI Rating : ‘शिवनेरी हापूस’सह अमरावती चणा, पिंपळी आणि अकोल्याच्या कागदी लिंबाच्या भौगोलिक मानांकनांची (जीआय) स्वीकृती झाली आहे.

गणेश कोरे

Pune News : साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने शिवनेरी परिसरातील हापूस आंबा इराणच्या राजाला भेट म्हणून पाठविला होता. त्याबदल्यात इराणच्या राजाने २०० उंटांची भेट पाठविल्याचा उल्लेखनीय इतिहास असलेल्या जुन्नरच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘शिवनेरी हापूस’सह अमरावती चणा, पिंपळी आणि अकोल्याच्या कागदी लिंबाच्या भौगोलिक मानांकनांची (जीआय) स्वीकृती झाली आहे. याबाबतची भौगोलिक उपदर्शन पत्रिका चेन्नईच्या जीआय नोंदणी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. यावर हरकती, सूचनांनंतर अंतिम मान्यता मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स विभागाने या संदर्भातील भौगोलिक उपदर्शक पत्रिका (जर्नल) प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शिवनेरी आंब्याबरोबरच कृषी विभागात अमरावतीतील पिंपळी ही औषधी वनस्पती, अमरावती चणा आणि अकोल्यातील कागदी लिंबाला देखील मानांकनासाठी (जीआय) स्वीकृती सादर केली आहे.

जुन्नर भागातील हापूसचा आकार, वजन, चव, रंग आणि वासाने इतर आंब्यांपेक्षा तसेच रत्नागिरी हापूसपेक्षा पूर्ण वेगळा आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये मध्ययुगीन कालखंड आणि शिवकाळात या आंब्याचा उल्लेख आहे. या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही संकल्पना मांडली. याबाबतचा पत्र व्यवहार २०१८ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केला होता. यानंतर या विषयाला चालना मिळाली.

यानंतर तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ‘जीआय’ मानांकनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २५ लाख रुपयांचा निधी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला दिला. यानंतर आंब्याचे ऐतिहासिक आणि शास्त्रोक्त माहिती पुरावे संकलनाची जबाबदारी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रावर सोपविण्यात आली.

या ऐतिहासिक शास्त्रोक्त माहिती संकलनासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, भारत टेमकर, प्रा. डॉ. लहू गायकवाड यांच्यासह उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी विशेष कष्ट घेतले होते. या स्वीकृतीवर हरकती, सूचनांनंतर अंतिम मान्यता मिळेल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT