Kolhapur Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, सरपंच पतीसह ७ जण गेले वाहून

Akiwat Flood : अकीवाट-बस्तवाड रोडला महापुरात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, तिघेजण बेपत्ता, चौघेजण सुखरूप, एकाची प्रकृती चिंताजनक.

sandeep Shirguppe

Kolhapur Shirol : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या अकिवाट गावात बस्तवाड वाहतूक मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झाल्‍याची घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेत सरपंच पती सुहास पाटील हे ही होते त्यांच्यासह अन्य दोघे गंभीर असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या ट्रॉलीत सात जण होते. यातील ४ जण सुखरूप आहेत. तर ३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याचे स्थानिकांकडून माहिती मिळाली. त्यांचा अध्यापही पत्ता लागलेला नाही. तातडीने एनडीआरएफचे पथक तैनात झाल्याने शोध मोहीम सुरू आहे.

शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात महापूर आल्याने ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळी शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून ७ जण जात होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली घसरून पलटी झाली.

यामध्ये चारजण पाण्यातून पोहोत पाण्याच्या प्रवाहातून बाजूला आल्याने ते सुखरूप बचावले आहेत. तर सरपंच पती सुहास पाटील हे गंभीर असल्याची माहिती आहे. तर दोघांचा अद्यापही शोध लागू शकला नाही. आपत्ती व्यवस्थापनातर्फे बेपत्ता झालेल्यांची शोधमोहीम सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT