Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetty : शेट्टींची उसाला ‘एफआरपी’ची मागणी चुकीची, ‘एमआरपी’ मिळावी

Sugarcane FRP Issue : उसाला एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर) ऐवजी एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) मिळालीच पाहिजे.

Team Agrowon

Kolhapur News : उसाला एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर) ऐवजी एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) मिळालीच पाहिजे. एमआरपीनुसार प्रतिटन उसाला पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी मागून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

यासाठी ‘नको एफआरपी हवी एमआरपी’ असा नारा जय शिवराय किसान संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, आझाद हिंद क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जय शिवराय शेतमजूर संघटना आणि जिद्द कामगार संघटनांनी दिला. कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये गुरुवारी (ता. १५) पत्रकार परिषद झाली.

जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, ‘माजी खासदार राजू शेट्टी यांची ताकद मोठी आहे. मात्र त्यांनी त्यांच्या ताकदीचा उपयोग करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे होता. मात्र उसाला एमआरपीऐवजी एफआरपी मागून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे.

एफआरपी वेळेत न देणाऱ्यांकडून कारखान्यांकडून त्या रकमेचे व्याज घेण्याऐवजी माजी खासदार शेट्टी यांनी आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दत्त साखर कारखान्याला व्याज मिळू नये असे पत्र दिले आहे.

दरम्यान, त्यामुळे ज्या नेत्यांनी व्याजासाठी लढा द्यायला पाहिजे होता, तेच नेते आता शेतकऱ्यांच्या हक्काचे व्याज नाकारत आहेत. या वेळी गुणाजी शेलार, राजेंद्र सुतार, ज्ञानदेव पाटील, मुकुंद पाटील, बाळासाहेब पाटील, नितीन पाटील, बाळासाहेब पाटील, शीतल कांबळे, गब्बर पाटील, युवराज आडनाईक, महेश मोहिते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT