Wet drought Agrowon
ॲग्रो विशेष

Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी

Crop Damage : परतीच्या पावसात वादळाचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांची कपाशी, मका, ज्वारी, बाजरी व फळबांगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Chalisgaon News : तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह सर्वांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

या संदर्भात नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीतून शेतकरी सावरत असतानाच यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

परतीच्या पावसात वादळाचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांची कपाशी, मका, ज्वारी, बाजरी व फळबांगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

त्यामुळे तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईसह पीक विम्याचा देखील लाभ मिळावा, अशी मागणी शेत शिवार पांदण रस्ते व शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

निवेदनावर संजीव पाटील (कळमडू), आधार वाघ (उंबरखेड), गोरख चव्हाण (लोंजे), सागर पाटील (उंबरखेड), अशोक पवार (राजमाने), राकेश पाटील (उंबरखेड), उत्तम पाटील (मुंदखेडे), अशोक रोकडे (पातोंडा), भालचंद्र पाटील (शिरसगाव), दिलीप पाटील (शिरसगाव), किरण पाटील (वाकडी), चिंधा भिल (ओझर), केशव रोकडे (पातोंडा), कल्याण पाटील (पातोंडा), विजय माळी (बहाळ), उखा राठोड (घोडेगाव) यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft : पोलिस पाटलांच्याच बागेतून डाळिंबांची चोरी

Diwali Bonus : महात्मा फुले दूध डेअरीतर्फे दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये बोनस

Soybean Procurement Center : सव्वा लाख हेक्टरवर सोयाबीन, तर खरेदी केंद्रे दोनच

Water Supply : ‘कोकाकोला’चे पाणी बंद करा

Golden Sitafal : गोल्डन सीताफळाकडे ग्राहकांची पाठ

SCROLL FOR NEXT