Wet Drought : सरसकट नुकसान ग्राह्य धरून ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Damage : बागलाणमध्ये गेल्या १० दहा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरिपातील जिरायती व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बागलाणमध्ये गेल्या १० दहा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरिपातील जिरायती व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून शासनाने सरसकट नुकसान ग्राह्य धरून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा तसेच नैसर्गिक आपत्ती पीकविमा मंजूर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या अनुषंगाने ‘शेतकरी संघटना’, ‘प्रहार शेतकरी संघटने’तर्फे खासदार डॉ. शोभा बच्छाव, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

प्रामुख्याने मका, बाजरी, सोयाबीन, खरीप कांदा, कांदा रोपवाटिकेसह डाळिंब, द्राक्ष व सीताफळ या फळपिकांचे नुकसान आहे. शेतकऱ्यांच्या हातातून पिके गेली असून जनावरांना चारासुद्धा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या कोणत्याही अटी शर्ती व आचारसंहितेचे कारण न दाखवता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतीची माती झाली आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Crop Damage
Wet Drought : पालघर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा

पावसाचा मोठा फटका पीक कापणीच्या कालावधीत बसल्याने शेतीसह फळपिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. या शेतीपूरक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवर वीज पडून नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्त हाक आता लोकप्रतिनिधी व प्रशासनाला दिली आहे.

भरपाई मिळवून देण्याचे खासदार डॉ. बच्छाव यांचे आश्‍वासन

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी परतीच्या पावसात सर्व पिकांची झालेली नुकसान सांगत १०० टक्के पीकविमा मंजूर करून बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली.

Crop Damage
Onion Crop Damage : पुरंदरमध्ये पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान

प्रत्येक शेतकऱ्याचे किमान ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीने पूर्ण विमा मंजूर करून नियमानुसार शेतीतील उरलेले पिकांचे अवशेष काढण्यासाठी त्वरित आठ दिवसांच्या आत २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.

तसेच काही शेतकऱ्यांचे पीक काढले गेले असले तरी काढलेले मका, बाजरी, सोयाबीन काळे पडून पूर्ण खराब झालेले आहे. त्यांचेदेखील शासनाने पंचनामे करावेत, अशीही मागणी केली. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून लवकरात लवकर प्रत्येकाच्या नुकसानीचे पंचनामे करून केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी बुधवारी (ता. २३) दिले.

तर निवडणुकीवर बहिष्कार; उमेदवारांना गावबंदी

शासनाकडून आपल्या कार्यालयाकडून दिरंगाई झाली शेतकऱ्यांना पंचनामे करून आर्थिक मदत मिळाली नाही तर येत्या विधानसभा निवडणकीवर संपूर्ण बागलाण तालुका बहिष्कार टाकेल व उमेदवारांना गावबंदी करण्यात येईल यांची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार, किरण मोरे आदींसह शेतकऱ्यांनी हा इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com