Solapur News : माळीनगर गट नंबर दोन येथील महात्मा फुले दूध व्यवसायिक सहकारी संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त प्रतिलिटर दोन रुपये बोनस तसेच सभासदांना सालाबादप्रमाणे १५ टक्के डिव्हिडंड देण्यात आला आहे. तसेच संस्थेचे वतीने दूध उत्पादकांचा अपघाती विमा उतरवण्याची परंपराही कायम ठेवली आहे.
संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज भोंगळे यांनी सांगितले, की सध्या खासगी दूध डेअरीने शिरकाव केल्यामुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. सहकारी दूध संस्थांचे संकलनामध्ये घट होत आहे. शासनाने दूध दरवाढ करावी.
जे दूध उत्पादक आमच्या संस्थेवर विश्वास ठेवून दूध पुरवठा करतात याची जाणीव ठेऊन संस्थेने अशा सर्व दूध उत्पादकांना २०२३-२४ या आर्थिक सालामध्ये वर्षभर पुरवठा केलेल्या संपूर्ण दुधावर प्रतिलिटर दोन रुपये बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
दिवाळीचे औचित्य साधून या बोनसचे वाटप करण्यात आले. तसेच सभासदांना सालाबादप्रमाणे १५ टक्के डिव्हिडंडही दिला आहे. संस्थेला तीस वर्षे पूर्ण झाले असून संस्थेने स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ कायम राखला आहे. संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी मिलिंद गिरमे यांनी ही संस्था नावारूपाला आणली.
दूध संकलन अधिकारी सर्जेराव कांबळे यांनी उत्तम गुण प्रतीचे दूध स्वीकारल्यामुळे दुधाला चांगला दर मिळाला. त्यामुळे पर्यायाने दूध उत्पादकांना चांगल्या दराचा फायदा मिळाला. संस्था स्वतःच्या पायावर भक्कम उभी असून शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाला आमची संस्था दूध पुरवठा करत आहे, असे या वेळी भोंगळे म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.