Wet Drought : पालघर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा

Paddy Crop Damage : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पडत असलेल्या पावसामुळे कापणीला तयार झालेल्या भातपिकाची मोठी नासाडी झाली आहे.
Paddy Crop Damage
Paddy Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Palghar News : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पडत असलेल्या पावसामुळे कापणीला तयार झालेल्या भातपिकाची मोठी नासाडी झाली आहे. विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

यात कापणीला तयार असलेले उभे भातपीक शेतात आडवे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेचे पालघर जिल्हाध्यक्ष माधव चौधरी यांनी केली आहे.

Paddy Crop Damage
Paddy Crop Damage : मुळशी तालुक्यात पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान

परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या भातपिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कापणीला तयार असलेले भातपीक जमिनीवर पडून पुन्हा त्याला कोंब येत आहेत. अशा विदारक परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

Paddy Crop Damage
Paddy Crop Damage : काढणीस आलेल्या भात पिकांचे पावसाने नुकसान

परतीचा पाऊस हा दरवर्षीच असाच धुमाकूळ घालत असतो. सध्या परतीच्या पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या आठवडाभरात हा पाऊस सायंकाळी अथवा दुपारच्या सुमारास येतो. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस जवळपास दोन ते तीन तास सलग पडतो. भातकापणीचा हंगाम सुरू असताना परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतात पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे भातशेती आडवी झाल्याने पावसाच्या पाण्यात भाताचा दाणा भिजत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ऐन भातकापणीवेळीच पाऊस पडत असल्याने पीक वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास भातपिकाचे नुकसान होणार आहे.

भात लागवडीसाठी सेवा सहकारी सोसायटीमधून कर्ज काढले आहे, मात्र परतीच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. आता कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न उभा आहे.
- नितीन चौधरी, शेतकरी
शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतात उभ्या असलेल्या भातपिकाला विमा देण्यात येत नाही, ही अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी आहे.
- माधव चौधरी, जिल्हाध्यक्ष, किसान सभा, पालघर जिल्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com