Water Supply : ‘कोकाकोला’चे पाणी बंद करा

Department of Water Conservation : वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत जलसंधारण विभागाकडून बांधण्यात आलेला तलाव आहे.
Water Supply
Water SupplyAgrowon
Published on
Updated on

Wada News : वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत जलसंधारण विभागाकडून बांधण्यात आलेला तलाव आहे. या तलावातून कुडूस गावाला व कोकाकोला कंपनीला पाणीपुरवठा केला जातो.

मात्र गावातील काही कुटुंबांना पाणी मिळत नाही. ज्यांना पाणी मिळते त्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कंपनीला दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Water Supply
Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

कुडूस गावात जलसंधारण विभागाने पाझर तलाव बांधण्यात आला होता. ग्रामपंचायतीची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा तलाव जलसंधारण विभागाकडून ग्रामपंचायतीकडेही वर्ग केला होता. त्यानंतर कोकाकोला कंपनीला डिसेंबर २०२३ मध्ये पाणीपुरवठा सुरू केला होता.

Water Supply
Water Supply Scheme : वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ८६५ कोटींची निविदा मंजूर
कोकाकोला कंपनीला दिला गेलेला पाणीपुरवठा बेकायदेशीर असून सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे.
- राजू जाधव, ग्रामस्थ, कुडूस
तलावामधून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी होते ते पाणी कोकाकोला कंपनीला देण्यात आले होते. त्याचा कंपनीकडून कर देण्यात आला आहे. आलेल्या निवेदनावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
- मुद्दसर पटेल, उपसरपंच, ग्रामपंचायत कुडूस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com