Sharad Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शक्तिपीठ महामार्गाबाबत शरद पवारांचे वक्तव्य, महामार्ग विरोधी परिषदेस हजर राहण्याचा दिला शब्द

Shakatipeeth Highway Sharad Pawar : शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो अनावश्यकच आहे. या महामार्गास माझा पूर्ण विरोध राहिल असे मत राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

sandeep Shirguppe

Sharad Pawar Kolhapur : शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो अनावश्यकच आहे. या महामार्गास माझा पूर्ण विरोध राहिल असे मत राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच कोल्हापुरात होणाऱ्या महामार्ग विरोधी राज्यव्यापी परिषदेस हजर राहणार असल्याचे ही पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या श्री पवार यांची बुधवारी(ता. ०४) शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने समन्वयक गिरीश फोंडे व शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी श्री फोंडे यांनी शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांनी या महामार्गास का विरोध केला याबाबत माहिती दिली.

यावेळी फोंडे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी दोन महामार्ग असताना, कोणाचीही मागणी नसताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादला जात आहे. कोल्हापूर मधील सहा तालुक्यातील संपूर्ण बागायत अशी ५ हजार १२८ एकर जमीन या महामार्गात संपादित होणार आहे.

मुख्यमंत्री यावर भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. या विरोधात आंदोलन आक्रमक करण्यासाठी १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत राज्यस्तरावरील सर्व पक्षांच्या प्रमुखांची राज्यव्यापी परिषद घेऊन पुढील रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले.

यावेळी शरद पवार म्हणाले की ,"शेतकरी या महामार्गास विरोध करत असतील तर त्यामागे त्यांची ठोस कारणे आहेत. मला प्रथम दर्शनी हा महामार्ग अनावश्यक वाटतो या अगोदरच पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे तो रद्द व्हायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शिवाय कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून दोघेही या परिषदेत येऊ."

शिवाजी मगदूम म्हणाले, महायुतीचे सरकार जर शेतकऱ्यांच्या वर हा महामार्ग लागत असेल तर शेतकरी लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील त्यांचे उमेदवार पराभूत करतील."

यावेळी कृष्णात पाटील, आनंदा पाटील यांनी देखील शेतकऱ्यांची भूमिका मांडली. यावेळी शिष्टमंडळामध्ये कृष्णात पाटील, दादासो पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, साताप्पा लोंढे,नामदेव खोंद्रे, संतोष लोंढे, बालु लोंढे, पिंटु पाटोळे, संजु वैराट, निवृत्ती पाटोळे, विष्णु सुळगावे,अजित चौगुले, विकास वैराट यासह विविध तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का?

Maharashtra Governor: आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल

Agriculture Investment : शेतीसाठीची गुंतवणूक आणि निविष्ठा अनुदान

Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट

Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल

SCROLL FOR NEXT