Sharad Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari 2025 : नव्या नेतृत्वातून चांगले कुस्तिगीर घडतील

Sharad Pawar : ‘‘कर्जत-जामखेडसारख्या दुष्काळी भागात अशी दर्जेदार स्पर्धा होणे साधी गोष्ट नाही. कुस्तिगीर परिषद ही महत्त्वाची संघटना आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : ‘‘कर्जत-जामखेडसारख्या दुष्काळी भागात अशी दर्जेदार स्पर्धा होणे साधी गोष्ट नाही. कुस्तिगीर परिषद ही महत्त्वाची संघटना आहे. यशवंतराव चव्हाणांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांनी कुस्तीच्या विकासासाठी काम केले. कुस्तीसाठी नवीन नेतृत्व तयार झाले पाहिजे. त्यांच्या कष्टाने राज्यात अनेक चांगले कुस्तीगीर तयार होतील, देशात व देशाबाहेर नाव कमावतील,’’ असा आशावाद असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने २६ मार्चपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु होती. रविवारी (ता. ३०) रात्री झाली. महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता वेताळ शेळके यांचा चांदीची गदा व बक्षीस देऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, हेमंत ओगले, जितेंद्र आव्हाड, खासदार नीलेश लंके, धैर्यशील मोहिते, माजीमंत्री विनायक पाटील, हर्षवर्धन पाटील, महादेव जानकर, आमदार नरेंद्र दराडे, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, राजे अमरजित घाटगे, रोहित पवार उपस्थिती होते.

शरद पवार म्हणाले, की राज्यात कुस्ती जपण्यासाठी प्रत्येकांनी काम केले आहे. अनेक गावांत चांगले, दर्जेदार कुस्तिगीर होऊन गेले. राज्य, देश आणि देशाबाहेर नाव मिळवले. आता नव्या पिढीकडे कुस्तीगीर परिषदेचे काम गेले असून त्यांच्या नेतृत्वातही चांगले कुस्तिगीर घडतील.

या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापुर आदी भागांत कुस्तीची परंपरा जपली जात आहे. महाराष्ट्र केसरी होणे साधी बाब नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्त्यात सहभाग घ्यायचा असेल तर मॅटच्या कुस्त्यांना प्राधान्य द्यायला सुरवात केली पाहिजे.

वेताळ शेळकेचा एकहाती विजय

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सेमी फायनलमध्ये गादी गटात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व शिवराज राक्षे यांच्या लढत झाली. यात पृथ्वीराज पाटील जिंकला. सेमीफायनलच्या माती गटात वेताळ शेळके (सोलापुर) आणि प्रशांत जगताप यांच्यात लढत होऊन वेताळ शेळके जिंकला. महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी गटातील विजेता पृथ्वीराज पाटील व माती गटातील विजेता वेताळ शेळके यांच्यात अंतिम लढत झाली.

अंतिम लढतीत वेताळ शेळके याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि सुरुवातीला पृथ्वीराज पाटीलवर डाव टाकीत चार गुणांची कमाई केली. शेवटी बहारदार खेळ करीत मुसंडी मारत, डाव टाकीत आणि युक्तीने वेताळ याने शेवटपर्यंत पृथ्वीराज याला खेळवीत ठेवले आणि शेवटी १- ७ च्या फरकाने वेताळ शेळके एकहाती विजय मिळवत ६६ वा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरल्याचे जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Scheme: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी होणार

Fish Farming: मत्स्यपालनामध्ये व्यावसायिक संधी...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

Soybean Milk Benefits: सोयाबीन दूध नवजात करडांसाठी फायदेशीर

Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT