डॉ. संदीप रामोड, डॉ. नरेंद्र प्रसादेLivestock Farming: सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे असतात. सोया दूध करडांना प्यायला दिल्यास करडांच्या वजनामध्ये चांगल्याप्रकारे वाढ होते. हे दूध करडांना पचनास हलके व लाभदायक असते..शेळ्यांच्या करडांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते. यासाठी करडांना जन्मापासून ते साठ दिवसापर्यंत दुधाची जास्त गरज असते. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या करडांना शेळीच्या दुधाची कमतरता असल्यास पर्याय म्हणून सोया दुधाचा वापर फायदेशीर ठरतो..Soya Milk Benefits : सोयाबीन दुधाचे आरोग्यदायी फायदे .करडांच्या आरोग्यासाठी फायदेकरडांच्या वाढीसाठी पूरक आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असते.करडांना पचनास हलके व लाभदायक असते.एक ग्लास सोया दुधामध्ये ३३० मिलि ग्रॅम कॅल्शिअम असते आणि ९५ कॅलरीज असतात.कॅल्शिअममुळे करडांच्या हाडांना मजबूत बनविण्यासाठी उपयुक्त आहे..सोया दूध निर्मितीची प्रक्रियाएक लिटर दूध बनविण्यासाठी, प्रथमतः एकूण १२५ ग्रॅम सोयाबीन घेऊन तपकिरी रंग येईपर्यंत भाजावे. दाणे थोडावेळ थंड करून, त्यांच्या वजनाच्या तीन पट पाणी (३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी) घेऊन सुमारे आठ ते बारा तासासाठी भिजवत ठेवावे.भिजविलेले सोयाबीन दाणे हाताने चोळून साल विरहित करावे. त्यामुळे सोया दुधाला चांगली चव प्राप्त होते. सालीसहित दूध चवीला योग्य नसतो.साल काढलेल्या सोयाबीन एक लिटर कोमट ऊर्ध्वपातित पाणी मिसळावे. मिक्सरच्या साह्याने जाडसर बारीक करून घ्यावे.तयार झालेला चोथा हा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. जमा झालेले द्रावण पुन्हा ५ ते ७ मिनिटे ३० अंश सेल्सिअस तापमानावर उकळून घ्यावे..Dairy Farming: ‘मिशन पन्नास लिटर’मुळे महाराष्ट्रात दूधक्रांती होईल.करडांसाठी वापर५० टक्के गाय किंवा शेळीचे दूध आणि त्यासोबत सोयाबीन दूध मिसळून करडांना द्यावे.सोया दूध निप्पल असलेल्या बाटलीच्या साह्याने करडांना पाजवावे..सोया दूध बनविण्याची पद्धतसाधारणतः एक किलो सोयाबीनपासून सुमारे सहा ते सात लिटर सोया दूध निर्मिती होते. या दुधास गाईच्या दुधासारखी चव नसली तरी त्यात कृत्रिम स्वादांचा वापर केल्यास चव सुधारते. सोया दुधामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असते. अल्प प्रमाणात कॅल्शिअम, संपृक्त स्निग्ध पदार्थ तसेच पोटॅशिअम, सोडिअमचे अत्यंत कमी प्रमाण असते..रासायनिक पृथक्करणघटक टक्केवारीप्रथिने : ४.००स्निग्धता : २.५आम्लता : ०.१७एकूण घनपदार्थ : १०.५२क्षार : ०.६०विशिष्ट घनता : १.०३- डॉ. संदीप रामोड, ९८६०९११९३८(सहयोगी प्राध्यापक, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.