Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. पण लोकसभेप्रमाणेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हाने शरद पवार यांचे ९ शिलेदार पाडले आहेत. विविध मतदार संघात तब्बल ३५ हजारहून अधिक मते पिपाणीला पडले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हात साम्य असल्याने मोठ्या प्रमाणात पिपाणीला मतदान झाले होते. यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचा पराभव झाला होता. तर काही ठिकाणी मताधिक्यात घट झाली होती. यामुळे शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह विधानसभेवेळी देवू नये, अशी विनंती केली होती. मात्र निवडणूक आयोगाकडे पिपाणी हे चिन्ह कायम ठेवले. तसेच याचे नाव बदलून ट्रम्पेट असे केले. पण ग्रामीण भागातील जनतेला यातील फरक उमगला नसल्याने पुन्हा एकदा शरद पवारांना याचा फटका बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या वाट्याला ८६ जागा आल्या. यापैकी फक्त १० जागाच जिंकता आल्या आहेत. तर पिपाणीमुळे जिंतूर, घनसावंगी, बेलापूर, आंबेगाव, अनुशक्तीनगर, केज. परांडा आदी मतदारसंघातील शरद पवार यांचे उमेदवार पडले.
यंदा विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. या उमेदवारांना निवडणुक आयोगाने पिपाणी चिन्ह दिले होते. याचा फटका सर्वाधिक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना बसला. विजय होणाऱ्या उमेदवारांच्या एकूम मतांमध्ये घट झाली.
पिपाणीला कुठे किती मते मिळाली?
बेलापूर मतदारसंघ
बेलापूर मतदारसंघात पिपाणीला १ हजार ८६० मते पडली. येथे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांना ९१ हजार ४७५ मते मिळाली. पण पिपाणीचा फटका बसल्याने विरोधक मंदा म्हात्रे यांना ३७७ अधिक मते मिळाली. त्यांना ९१ हजार ८५२ मते मिळाली.
पिपाणीला ३ हजार ८९२ मते
असाच प्रकार शहापूर मतदार संघात झाला असून येथे पिपाणीला ३ हजार ८९२ मते पडली आहेत. तर राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्या पेक्षा दौलत दरोडा यांना १ हजार ८७२ चे मताधिक्क मिळाले. दौलत दरोडा यांना ७३ हजार ०८१ मते पडली आहेत.
सना मलिक यांचा ३ हजार ३७८ मतांनी विजय
सगळ्यात चर्चेत राहिलेला अणुशक्ती नगर मतदार संघात फहाद अहमद यांच्यापेक्षा सना मलिक यांना ३ हजार ३७८ अधिक मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. येथे पिपाणीला ४ हजार ०७५ मते मिळाली.
जिंतूरमध्ये पिपाणीला ७ हजार ४३० मते
तर जिंतूर मतदार संघाच पिपाणीने ७ हजार ४३० मते घेत शरद पवार यांचे उमेदवार विजय भांबळे यांना पाडले. येथे मेघना बोर्डीकर विजयी झाल्या. येथे बोर्डीकर यांना ४ हजार ५१६ चे लिड मिळाले.
राजेश टोपेंचा १ हजार ५२३ मतांनी पराभव
तसेच घनसावंगी मतदार संघात राजेश टोपेंचा १ हजार ५२३ मतांनी पराभव झाला. तर पिपाणीला ४ हजार ८३० मते मिळाली. तर हिकमत उधाण यांचा २ हजार ३०९ मतांनी विजय झाला.
दिलीप वळसे-पाटीलांना फायदा
आंबेगावचे उमेदवार आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी आपल्याला पिपाणीचा फायदा झाल्याचे म्हटले होते. त्यांचा १ हजार ५२३ मतांनी विजय झाला होता. तर पिपाणीला २ हजार ९६५ पडली होती.
परांड्यात पिपाणीला ४ हजार ४४६ मते
परांडा मतदारसंघात देखील पिपाणीला ४ हजार ४४६ मते पडली. ज्यामुळे शरद पवार यांच्या राहुल मोटे यांचा पराभव १ हजार ५०९ मतांनी झाला. येथे तानाजी सावंत १ लाख ३ हजार २५४ मतांनी विजयी झाले.
राणी लंकेंचा १ हजार ५२६ मतांनी पराभव
पारनेरमध्ये काशिनाथ म्हादू दाते यांचा १ हजार ५२६ मतांनी निसटता विजय झाला. तर राणी लंके यांना १ लाख १२ हजार १०४ मते पडली. तर पिपाणीला ३ हजार ५८२ मते मिळाली.
केजमध्ये मुंदडांना पिपाणीचा आधार
केज मतदारसंघात पिपाणीला ३ हजार ५५९ मते मिळाल्यामुळे पृथ्वीराज साठे यांचा २ हजार ६८७ मतांनी पराभव झाला. येथे नमिता मुंदडा यांना १ लाख १७ हजार ८१ मते मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.