Milk Rate
Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : नाशकात शरद पवार गट दूध दरावरून आक्रमक; दुधाला ४० रू भाव देण्याची मागणी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेली काही दिवसापासून दुधाचे दर ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्याच्या विविध भागात शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच दुधाला कमीत कमी ४० रूपये दर देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. यादरम्यान शनिवारी (ता.२९) नाशिकमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच दुधाला दर मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. 

एकीकडे राज्याचे अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून निषेध व्यक्त केला होती. तर आज दुसरीकडे थेट गाईच जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. नाशकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गायींसह मोर्चा काढला. 

ढासळलेल्या दूध दरासंदर्भात सरकारचा निषेध केला. सरकारने तातडीने दूध दरवाढ करण्याची घोषणा करताना दुधाला किमान ४० रूपये दर द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच दुधाला कोणतेही अनुदान नको फिक्स रेट द्यावा अशीही आग्रही मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे. 

महाराष्ट्र वगळता कर्नाटक असो किंवा गुजरात येथे दुधाला चांगला भाव मिळत आहे. मात्र राज्यात अवघे २२ ते २५ रूपयेच भाव मिळत आहे. त्यामुळे राज्यातला शेतकरी मेटाकूटीला आल्याने दुधाला भाव द्या अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे. यावेळी दुधाला भाव मिळालाच पाहिजे. दूध उत्पादकांच्या मागणी पूर्ण करा. दुधाला ४० रू भाव द्या. अनुदान नको फिक्स रेट द्या अशा मगण्यांनी परिसर शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. 

जालन्यात दूध पावडर आयातीच्या निर्णयाची होळी 

यादरम्यान जालन्यात दूध पावडर आयातीच्या निर्णयाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. राज्यभर दुधदरवाढी संदर्भात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. याकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकारने दुध पावडर आयातीचा निर्णय घेतला. त्यावरून जालन्यात या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील दूध उत्पादक शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. येथील अडगावात दूध दरवाडीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. तसेच दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. तर दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सरकारने तातडीने दूध दरवाढ न केल्यास पुढच्या काळात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

Farmer Registration : रेशीम शेतीसाठी पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी

Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

SCROLL FOR NEXT