Sharad Pawar in Karad agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा 'पुन:श्च हरी ओम!', कऱ्हाडातील प्रितीसंगमावर दाखल

Sharad Pawar in Karad : अजित पवारांसह राष्ट्रवादी नेत्यांनी रविवारी बंड केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली असून आज कऱ्हाड येथील प्रितीसंगमावर दाखल झाले.

Team Agrowon

Sharad Pawar At Yashwantrao Chavan Memorial : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या बंडामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील सर्वात मोठा बंडानंतर दशरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. बंडानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार पुण्यातून कऱ्हाडला दाखल झाले. यावेळी ठिकठिकाणी शरद पवार समर्थक त्यांचे स्वागत केले. शरद पवार यांनी प्रितीसंगमावर स्मृतिस्थळावर अभिवादन करून भाजप विरोधी लढाईसाठी रणशिंगे फुंकले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात रविवारी मोठे बंड केले. या बंडात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांनी आपल्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, या बंडानंतर शरद पवार पुन्हा पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत.

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारांनी भाजप सरकारला समर्थन दिल्याने शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. कालच शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याप्रमाणे आज सकाळी शरद पवार पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानावरून कऱ्हाडच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, नातू रोहित पवार होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी पवारांचे स्वागत केले. आम्ही तुमच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

११ वाजण्याच्या सुमारास शरद पवार कऱ्हाडमध्ये दाखल होताच साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर कऱ्हाडमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करत प्रतिसंगमावर दाखल झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

शरद पवार यांनी ५ तारखेला बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांशी चर्चा सुरू केली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यासोबत संपर्क साधला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT