Sharad Pawar and Vijay Wadettiwar On Maharashtra GDP Agrowon
ॲग्रो विशेष

Share of Maharashtra GDP : जीडीपीत महाराष्ट्राची पीछेहाट; शरद पवार, वडेट्टीवार यांची सरकारवर टीका, भाजपचेही प्रत्युत्तर

Sharad Pawar and Vijay Wadettiwar On Maharashtra GDP : गेल्या दशकभरात सकल उत्पन्नात (जीडीपी) देशात अव्वल असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण झाली आहे. तर दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशाच्या आर्थिक आलेखात कायमच पहिल्या स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्राची गेल्या दशकभरात पीछेहाट झाली आहे. देशाच्या सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटल्याची माहिती पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. यावरून ऐन निवडणुकीत महाविकास आघाडीला आयतं कोलीत मिळालं आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून १९६०-६१ ते २०२३-२४ या कालावधीतील राज्यांच्या आर्थिक कामगिरीचा अहवाल नुकताच सादर झाला. या अहवालातून सकल राज्य उत्पन्नाच्या वाट्यात महाराष्ट्राची १५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर घसरण झाली आहे. तर सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती झाल्याचे म्हटलं आहे.

शरद पवार यांची टीका आणि सल्ला

महाराष्ट्राचा वाटा दोन टक्क्यांनी घटल्यावरून शरद पवार यांनी दीपावली पाडव्यावर सरकारवर निशाना साधला. गोविंदबागेतील पत्रकार परिषदेत सरकारला लक्ष करताना पवार म्हणाले, या निवडणूका झाल्या की खरी आर्थिक स्थिती समोर येईल. आताच्या सरकारने काही योजनांसाठी गरीबांचा पैसा वळवल्यामुळे गरीबांच्या पदरात काहीच पडलेले नाही. नुकताच आर्थिक सल्लागार परिषदेने याबाबत अहवाल दिला असून एकेकाळी अव्वल स्थानावर असणारे आपले राज्य आज पहिल्या पाचमध्ये देखील नाही.

याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही राज्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी पावले उचलावी लागतील. तरच हा प्रश्न सुटेल. राजकारण करण्यापेक्षा सध्याची परिस्थिती गंभीर असून याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

राज्याची पिछेहाट झाली : वडेट्टीवार

याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये टीका केली. महाराष्ट्राची अधोगतीवर आम्ही सतत बोलत आहोत. पण भाजप आणि महायुतीतले आम्हालाच खोटे ठरवत होते. मात्र आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच सत्य समोर आणले आहे. आपले राज्य निर्माण झाल्यापासून अव्वल होते. पण मागील १० वर्षांत विविध क्षेत्रात राज्याची पिछेहाट झाली. जीडीपीमध्ये १५.२ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर राज्याची घसरण झाली आहे. आमच्या मागचे तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, पंजाब ही राज्ये पुढे गेली आहेत. महाराष्ट्र ११ व्या स्थानावर फेकला गेल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

आमच्या काळात जीडीपी कमी झाला नाही : शेलार

दरम्यान मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी यावरून राज्य सरकारची बाजू मांडली आहे. यावेळी शेलार यांनी याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले असून राज्याचा जीडीपी आमच्या काळात नाही. तर आघाडीच्या काळात कमी झाला. आमचे सरकार आल्यानंतर यात सुधारणा झाली आहे.

२०२१ ला जीडीपी १३ टक्के होता जो आम्ही २०२३ मध्ये १३.३ पर्यंत आणला. आताही आमचा प्रयत्न यात सुधारणा करण्याचा असेल. तसे प्रयत्न आम्ही सुरू देखील केले आहेत. पण विरोधक ज्या गुजरातचा उल्लेख करत आहेत. त्यांचा जीडीपी आजही ८ टक्क्यांवरच आहे. यामुळे महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे असून पुढेच राहील, असा दावाही शेलार यांनी केला आहे.

अहवालातून महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट

एकीकडे गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक झाला जो महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. या अहवालातून महाराष्ट्राचा वाटा १३.०३ टक्के झाला असून तो ८० च्या दशकात १४.२२ टक्के होता. ९० मध्ये १४.६ टक्के आणि २००० साली १४ टक्क्यांवर आला. २०१० मध्ये १५.२ टक्क्यांवर आला. मात्र २०२० मध्ये थेट २.२ टक्क्यांची घसरण होऊन राज्याचा वाटा १३ टक्क्यांवर आला. २०२३ मध्ये हा वाटा १३.३ टक्क्यांवर गेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk Farming : सर्वत्र विणले जावे रेशीम जाळे

Agricultural Electricity : सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू : अजित पवार

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

Sugarcane Crushing : ‘छत्रपती’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Millet Rate : दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा

SCROLL FOR NEXT