Sharad Pawar and Uddhav Thackeray  Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar and Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मोदींवर जोरदार टीका

Sharad Pawar, Uddhav Thackeray on Narendra Modi : राज्यातील विविध दोन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ व्या लोकसभेच्या अखेरच्या अधिवेशनातील शेवटच्या दिवशी राज्यसभेत भाषण केले होते. त्यांनी यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. तसेच काही दिवसांच्या आधी भारत रत्नची घोषणा केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर रविवार (११ रोजी) टीका केली आहे. संसदेतील नेहरू यांच्यावरील टीका आणि ईडीच्या दुरूपयोगावरून शरद पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. तर हरितक्रांतीचे जनक डॉ. एम.एस.स्वामीनाथन आणि बिहाराचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केल्यावर ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.

हे शहाणपणाचं लक्षण नाही

पंतप्रधान मोदी यांचे ते भाषण ऐकले. पण मोदींनी यात काहीही विधायक सांगितले नाही. फक्त इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. पण नेहरुंनी लोकशाही रुजवली, शासन आणलं. आज त्यांच्यावर मोदी यांनी व्यक्तिगत टीका केली. यातून त्यांना नक्की काय साध्य होणार हे माहीत नाही. मात्र ज्या नेहरूंनी या देशाला दिशा दिली, कष्ट घेतले त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही, असे पवार म्हणाले.

अप्रत्यक्षपणे अजित पवार गटास टोला  

दरम्यान त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती करताना अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाला टोला लगावला आहे. शरद पवार यांनी, आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगताना, लोकांमध्ये जनमत तयार करावे लागेल. पण काही लोकांनी आपण का गेलो हे सांगताना विकासाचा मुद्दा समोर आणला. पण ही गंमतच असल्याचे पवार म्हणाले. तर संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाला महत्त्व असते की नाही असा सवाल त्यांनी अजित पवार गटाला उपस्थित केला आहे.  

आता फक्त मतांसाठी

दरम्यान डॉ. स्वामीनाथन आणि बिहाराचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न घोषीत झाल्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे आता फक्त मतांसाठी भारतरत्न वाटत फिरत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी ही टीका स्थानिक लोकाधिकार समिती अधिवेशनातून केली आहे. तसेच, स्वामीनाथन यांना भारत रत्न देण्याआधी स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे म्हटले आहे. 

भाजपचा पोकळपणा

तसेच स्वामीनाथन यांनी काही झाडं लावली किंवा जगवली नाहीत. तर त्यांनी झाडं लावणाऱ्याला जगवलं आहे. तर त्यांनी केलेल्या शिफारशी अंमलबजावणी न करता त्यांना भारतरत्न देणे म्हणजे पोकळपणा असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. 

जनसंघानं शिव्या घातल्या 

तसेच पूर्वी भारतरत्न पुरस्कार वर्षाला किती द्यावेत? कोणाला द्यावेत? याचे समिकरण ठरलेले होते. मात्र आता मोदी आपल्या मनाप्रमाणे कोणालाही देत आहेत. याचा अर्थ त्यांनी ज्यांना ते दिलेत त्याला माझा विरोध नाही. तर हे लोक जेंव्हा हयातीत होते तेंव्हा त्यांना कडाडून विरोध याच लोकांनी केला.

कर्पुरी ठाकूर हे बिहारमध्ये मंत्रीमंडळात १९७८-७९ होते. त्यांनी सरकारी नोकरीत २६ टक्के आरक्षण मागासवर्गीय व वंचितांना दिले. त्यावेळी जनसंघानं रस्त्यावर उतरून याला विरोध केला होता. त्यांना जनसंघानं शिव्या घातल्या होत्या. पण आता ७९ सालांनंतर फक्त बिहारमध्ये मतं पाहिजेत म्हणून ठाकूर यांना भारतरत्न दिला जातोय असे ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT