Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग होणार नाही

Ajit Pawar News : राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ११) येथे दिली.

Team Agrowon

Kolhapur News : राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ११) येथे दिली. भूसंपादनासाठी निधी माझ्याच विभागाकडून जातो, यामुळे मी निधी दिल्याशिवाय भूसंपादनाचे काम होणार नाही.

या बाबत मुंबईत गेल्यावर मी सविस्तरपणे माहिती घेईन. जरूरत पडली तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलावेन, असेही श्री. पवार यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली.

गिरीश फोंडे यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरसह बारा जिल्ह्यांचे शेतकरी आंदोलन करत आहेत. शासनाने तत्काळ हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती असल्याचे सांगतात. पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीस देत आहेत. तसेच पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत. हे चुकीचे आहे, असे श्री. फोंडे यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर श्री. पवार म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे माझा देखील या शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे. हा महामार्ग होणार नाही. पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावाचा पुरावा कोणाकडे नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT