Nanded Water agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Water : नांदेडला ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता वाढली

Nanded Drought : टँकरसाठी १८ तर टँकर व्यतिरिक्त १५० अशा १६८ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून देण्यात आली.

Team Agrowon

कृष्णा जोमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. पाच मेपर्यंत जिल्ह्यात १५ टँकर सुरू करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच टँकरसाठी १८ तर टँकर व्यतिरिक्त १५० अशा १६८ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. परिणामी, उकाड्याने नागरिक हेरान झाले आहेत. दिवसभर तीव्र ऊन आणि रात्री उष्ण हवा यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. अशातच जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रताही वाढली आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यात अनेक पशू आपले प्राण गमावत आहेत. अशा भीषण टंचाईच्या काळात नागरिकांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सहा गावे २१ वाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात कंधार तालुक्यातील एक गावे सहा वाड्या, माहूर तालुक्यांतील एक गाव, मुखेड तालुक्यातील दोन गावे १४ वाड्या, हदगाव तालुक्यात एक गाव, व भोकर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. या गावांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर टँकरसाठी १८ तर टँकरव्यतिरिक्त १५० गावात खासगी विहिरींचे अधिगृहण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, आगामी काळात नांदेडमध्ये टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाय-योजना राबविण्यात येत असल्याचे कळाले.

शहरी भागातही पाणीटंचाई

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागाप्रमाणेच नांदेड शहरासह तालुकास्तरावर पाणीटंचाई तीव्र झाली आहे. नांदेड शहरातील कूपनलिका एप्रिल महिन्यातच बंद पडल्याने नागरिकांना महापालिकेच्या पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. परंतु महापालिकेचे पाणी चार दिवसांआड येत असल्याने वसतिगृह चालक, हॉटेल, वॉटर फिल्टर प्लॅन्ट, सदनिकांसह अनेकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकी तेजीतच; सोयाबीन दर स्थिर, कापसाच्या दरात सुधारणा, हरभरा आवकेचा दबाव तर खरबूजाला उठाव

Solapur DPC Funds: डीपीसीचा निधी १५ दिवसांत द्या: खा प्रणिती शिंदे

Fishermen Crisis: मासेमारी बोटींचा किनाऱ्यावर मुक्काम

Social Awareness: वैज्ञानिक दृष्टिकोन हरवला तर लोकशाहीला धोका : जयदेव डोळे

Sand Auction Opposition: गिरणा नदीपात्रातील वाळू लिलावास विरोध

SCROLL FOR NEXT