Nanded Water Storage : नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा

Water Scarcity : जिल्ह्याचे तापमान ४३ अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे.
Water Shortage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्याचे तापमान ४३ अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. परिणामी मे महिन्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शनिवारी (ता. २६) पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता चौगुले, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर इरलोड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाचे प्रतिनिधी इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हीसीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी सहभागी होते.

सध्या मानार प्रकल्पात ४६ टक्के, विष्णुपुरी प्रकल्प ३१ टक्के, मध्यम प्रकल्प २९ टक्के, उच्च पातळी बंधारे ३६ टक्के, लघु प्रकल्प १९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा माहे जून अखेरपर्यंत पुरेसा आहे. परंतु जूनमध्ये पर्जन्यमान कमी झाल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Water Shortage
Water Scarcity : पाणीटंचाईमुळे १० दिवसांत वाढले ५२ टँकर

मुखेड तालुक्यामध्ये वाडी तांड्यावर टँकर व विहीर अधिग्रहणाची संख्या जास्त असल्यामुळे जल जीवन मिशनची कामे तत्काळ पूर्ण करून टंचाईग्रस्त वाडी, तांड्यावरील टंचाईची समस्या मिटवावी तसेच जलयुक्त शिवारची कामे हाती घ्यावीत, अशा सूचना संबंधित विभागास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत.

Water Shortage
Water Scarcity: संत्रापट्ट्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी काढल्या बागा

मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार असल्यामुळे विविध जलाशयातून, कॅनालद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची चोरी होणार नाही यादृष्टीने अनधिकृत मोटारी जप्त करण्याबाबत पथकांची नियुक्ती करण्यात यावी. जलयुक्त शिवाराची जास्तीत जास्त कामे हाती घेऊन पूर्ण केल्यास सिंचनासाठीच्या पाण्याची आवश्यकता कमी होईल त्यादृष्टीने संबंधित विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

१४ टँकर सुरू व ९१ विहिरीचे अधिग्रहण

सध्या जिल्ह्यात १४ टँकर व ९१ विहीर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा चालू असून आणखी ६ टँकर व १९७ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर आहेत. नळ योजना दुरुस्ती २१५ प्रस्ताव, पूरक नळ योजना ६६ व नविन विंधन विहीर ७४० अशा विविध योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यामुळे ही कामे प्रगतिपथावर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com